शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

मोदींच्या सभेहून परतणाऱ्य़ा भाजपा समर्थकांवर तुफान दगडफेक; एक पोलीस ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 10:14 PM

मुख्यमंत्री योगी यांच्याकडून 50 लाखांची मदत जाहीर 

गाजीपूर : बुलंदशहरमध्ये भडकलेल्या हिंसेवेळी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना ताजीच असताना गाजीपूरमध्येही एका पोलीस जवानाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 उत्तरप्रदेशमधील गाजीपूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेला गेलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर निषाद पार्टी आणि एसबीएसपीशी संबंधित आंदोलनकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये सुरेश कुमार हा पोलीसही जखमी झाला. ही घटना कठवा मोडच्या जवळ घडली. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर दोन्ही बाजुंनी दगडफेक होऊ लागली. यामुळे पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी हस्तक्षेप केला. 

या दगडफेकीमध्ये सुरेश यांच्यासह अन्य दोन पोलीस जखमी झाले. मात्र, सुरेश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात येत असून अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. घटनेनंतर पोलिसांनी निषाद पक्षाच्या 10 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ठिकठिकाणी छापे मारण्यात येत आहेत. 

मुख्यमंत्री योगी यांच्याकडून 50 लाखांची मदत जाहीर मृत शिपाई सुरेश याच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सुरेश यांच्या पत्नीला 40 लाख आणि त्याच्या आई-वडिलांना 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. शिवाय सुरेशच्या पत्नीला पेन्शन आणि परिवारातील सदस्याला नोकरी देण्याची घोषणाही केली आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ