राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 04:45 PM2020-12-29T16:45:04+5:302020-12-29T16:45:38+5:30

Crime News : राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे.

Stones hurled at a rally to collect donations for the Ram Mandir, injuring several | राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक, अनेकजण जखमी

राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक, अनेकजण जखमी

Next

इंदूर - मध्य प्रदेशमध्येराम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. काही दिवसांपूर्वी उज्जैन येथे रॅलीवर दगडफेक झाल्यानंतर आज इंदूरमध्ये अशाच रॅलीवर दगडफेक झाली. एका धर्मस्थळाशेजारी हनुमान चालिसेचे पठण केल्याने वादाला तोंड फुटले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. परिस्थिती पाहून पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

ही घटना इंदूरमधील गौतमपूरा ठाणे परिसरातील चांदनखेडी गावात मंगळवारी सकाळी घडली. हिंदुत्ववादी संघटनांनी रॅलीवर दगडफेक केली. ही रॅली अयोध्येत बांधण्यात येत असेल्या राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी काढण्यात आली होती. ही रॅली एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना दोन पक्षांमधील लोक आमने-सामने आले. त्यानंतर दगडफेकीस सुरुवात झाली. यात डझनभर लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला.

गावातून सकाळी काही कार्यकर्ते रॅली काढत होते. तेव्हा तिथे पोलीस उपस्थित होते. ही रॅली जेव्हा एका गावातून दुसऱ्या गावात जात होती. तेव्हा वाटेत एका धार्मिक स्थळाजवळ उभे राहून या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्यास सुरुवात केली. हे कार्यकर्ते पुढे जात होते. तेवढ्यात काही जण तिथे आले. त्यानंतर वादास सुरुवात झाली. पोलीस परिस्थितीतीवर नियंत्रण मिळवणयसाठी प्रयत्न करत असतानाच दगडफेक सुरू झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उज्जैनमध्येही राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक झाली होती.

Web Title: Stones hurled at a rally to collect donations for the Ram Mandir, injuring several

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.