हॉकर्सचे रास्ता रोको, जेलभरो वाहतूक ठप्प: ३०० महिला, पुरुषांना अटक व सुटका; आज मनपासमोर ठिय्या
By admin | Published: May 11, 2016 10:14 PM
जळगाव : हॉकर्स विरोधातील प्रशासनाच्या धोरणाविरोधात अजिंठा चौफुलीवर जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. विविध घोषणा देणार्या हॉकर्स महिला व पुरुषांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची नोटीस देऊन सुटका केली. दरम्यान, सलग दुसर्या दिवशी शहरातील भाजी, फळ बाजार बंद होता. गुरुवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
जळगाव : हॉकर्स विरोधातील प्रशासनाच्या धोरणाविरोधात अजिंठा चौफुलीवर जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. विविध घोषणा देणार्या हॉकर्स महिला व पुरुषांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची नोटीस देऊन सुटका केली. दरम्यान, सलग दुसर्या दिवशी शहरातील भाजी, फळ बाजार बंद होता. गुरुवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय संघटनेने घेतला आहे. हॉकर्स संघर्ष समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १० मे पासून बेमुदत व्यवसाय बंदची हाक देऊन सहकुटुंब आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सर्व हॉकर्सने मंगळवार पासून बेमुदत व्यवसाय बंद आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. रास्ता रोकोेत कुटुंबीयदुसर्या दिवशी हॉकर्स संघर्ष समितीने बंद आंदोलन सुरूच ठेवले. सकाळी सुभाष चौक परिसरातील चौबे व्यापारी संकुलाजवळ हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी तसेच हॉकर्स बांधव कुटंुबीयांसह एकत्र आले होते. येथून विविध घोषणा देत ही सर्व मंडळी पुष्पलता बेंडाळे चौक, नेरी नाका मार्गे अजिंठा चौफुलीवर पोहोचली. तेथेही विविध घोषणा सुरू होत्या. चौकात रस्त्यावर एकत्र येऊन व काही जणांनी आडवे पडून रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास २० ते २५ मिनिटे हे आंदोलन सुरू होते. चौकात रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत पोलिसांच्या गाड्यांमध्ये बसून हॉकर्स बांधव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेले. तेथे उपस्थित असलेल्या अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी हॉकर्सच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. तसेच निवेदन दिले.