नाफेड तूर खरेदीतील गैरप्रकार थांबवा
By admin | Published: March 23, 2017 5:16 PM
तेल्हारा : नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकर्याच्या नावावर व्यापार्यांची तूर अवैधरीत्या मोजल्या जात असून सदर गैरप्रकार थांबविण्याची मागणी करणारे निवेदन नाफेडला तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांनी आज २१ मार्च बुधवारी तेल्हार्याचे तहसीलदार यांना दिले आहे.
तेल्हारा : नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकर्याच्या नावावर व्यापार्यांची तूर अवैधरीत्या मोजल्या जात असून सदर गैरप्रकार थांबविण्याची मागणी करणारे निवेदन नाफेडला तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांनी आज २१ मार्च बुधवारी तेल्हार्याचे तहसीलदार यांना दिले आहे.तेल्हारा बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली आहे. दीड महिन्याचा कालावधी उलटूनही खरेदी केंद्रावर तुरीच्या पोत्याचे ढीग लागले आहेत. शेतकर्यांना आपल्या तुरीचे मोजमापासाठी महिना महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकर्यांचे नावावर अवैधरीत्या व्यापार्याचे मोजमाप होत असल्याच्या अनेक आरोप झाले आहेत. आज शेतकर्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून केंद्रावर माप धिम्या गतीने होत असून काट्याची संख्या वाढविणे व गैरप्रकार थांबविण्याची मागणी केली आहे. निवेदनावर उत्तम नळकांडे, विजय बोर्डे, प्रदीप महल्ले, विशाल गाडेकर, महेश वडतकार, शुभम वडतकार, उमेश बाजोड, विजय वाकोडे, देवानंद वडतकार, अंकूश मिरगे, सागर पाथ्रीकर, धनंजय गावंडे, नीलेश वाकोडे, प्रशांत वाकोडे, सोपान सरोदे व पवन कोल्हे आदी शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत. (शहर प्रतिनिधी)शेतकर्यांचा माल बाजार समिती यार्डमधून अफरातफर होणे, ही बाब अत्यंत गंभीर असून यामध्ये दोषी असणार्याविरुद्ध कार्यवाही करून सत्य काय आहे ते बाहेर काढू व शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहू.- श्यामशील भोपळेविरोधी पक्ष नेता, बाजार समिती, तेल्हारा.*नाफेड खरेदी सुरू झाल्यापासून बाजार समिती यार्डमध्ये शेतकर्यांच्या मालाची नासाडी होत आहे. शेतकर्यांनी याबाबत बाजार समितीकडे तक्रार देऊनही काही फायदा झाला नाही.- गजानन सुशिरशेतकरी.