15 मजूर खाणीत अडकले अन् तिकडे मोदी फोटो काढण्यात दंग- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:30 PM2018-12-26T15:30:51+5:302018-12-26T17:05:47+5:30
मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत.
शिलाँग- मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अभियान राबवलं जातंय. परंतु अद्यापही त्यांना खाणीतून बाहेर काढण्यात यश मिळालेलं नाही. याच मुद्द्याचा आधार घेत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच त्या कोळशाच्या खाणीत अडकून पडलेल्या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्याची मागणी राहुल गांधींनी मोदींकडे केली आहे.
13 डिसेंबर रोज मेघालयातील एका कोळशाच्या खाणी 15 खनिकर्मचारी अडकून पडले आहेत. राहुल गांधींनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंपाची व्यवस्था करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधानांनी या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले पाहिजेत.
राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, पाण्यानं भरलेल्या कोळशाच्या खाणीत गेल्या आठवड्यात 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना त्या खाणीत श्वास घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोगीबील सेतूवर कॅमेऱ्यांसमोर पोज देत फिरत आहेत. त्यांच्या सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंप देण्यास नकार दिला आहे.
15 miners have been struggling for air in a flooded coal mine for two weeks.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 26, 2018
Meanwhile, PM struts about on Bogibeel Bridge posing for cameras.
His government refuses to organise high pressure pumps for the rescue.
PM please save the miners. https://t.co/STZS62vTp4
तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर टीका केली होती. 11 दिवस 15 खनिकर्मचारी मेघालयात अडकून पडले आहेत. खाणीतून पाणी काढण्याचं काम जलदगतीनं केलं पाहिजे. एक एक मिनिट महत्त्वपूर्ण आहे. मोदी सरकारकडूनही उशिरानं यावर प्रतिक्रिया येत आहे. त्या खनिकर्मचाऱ्यांचा जीव वाचावा, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचंही सुरजेवाला म्हणाले आहेत.
National Disaster Response Force (NDRF) team present at the coal mine in Meghalaya's East Jaintia Hills, where 13 workers are trapped since more than two weeks. Search and rescue operation still underway. pic.twitter.com/exadYzfIAX
— ANI (@ANI) December 26, 2018