इयर एंडींगला कर्नाळा अभयारण्यात नो एंट्री थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृह बंद : प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
पनवेल : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कर्नाळा अभयारण्यातील शांतता भंग होऊ नये याकरिता या ठिकाणच्या विश्रामगृहात पर्यटकांना मुक्कामासाठी तीन दिवस मनाई करण्यात आली आहे. परिसरात कोणत्याही स्वरुपाचा गडबड गोंधळ होणार नाही याकरिता परिक्षेत्र वन कार्यालयाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सुीच्या दिवशी पर्यटकांची लगबग आणि गोंधळापासून अभयारण्यात दोन तीन दिवस निरामय शांतता ठेवण्यात येणार असून पशुपक्ष्यांची प्रदूषणापासून सुटका होणार आहे.
पनवेल : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कर्नाळा अभयारण्यातील शांतता भंग होऊ नये याकरिता या ठिकाणच्या विश्रामगृहात पर्यटकांना मुक्कामासाठी तीन दिवस मनाई करण्यात आली आहे. परिसरात कोणत्याही स्वरुपाचा गडबड गोंधळ होणार नाही याकरिता परिक्षेत्र वन कार्यालयाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सुीच्या दिवशी पर्यटकांची लगबग आणि गोंधळापासून अभयारण्यात दोन तीन दिवस निरामय शांतता ठेवण्यात येणार असून पशुपक्ष्यांची प्रदूषणापासून सुटका होणार आहे.पनवेल शहरापासून १२ किमी. अंतरावर विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी व पक्षांनी समृद्ध असे कर्नाळा अभयारण्य असून वर्षभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा समुद्रसपाटीपासून उंचीवर असल्याने येथील हवामानही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतद्वाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सुर्यपक्षी, हरियल यांसारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत.गोवा आणि कोकणात जाणारे येणारे प्रवासीही येथे थांबतात. अतिशय निरामय शांतता असलेल्या या अभयारण्याच्या शांततेला दिवसेंदिवस तडा चालला आहे. मात्र ध्वनीप्रदुषणाचा पक्षांवर विपरीत परिणाम होत चालला असून सुीच्या दिवसांत त्या ठिकाणी रेडिओ, टेपरेकॉर्डर, गाड्यांचे हॉर्न आदींचा आवाज येतो. अपुर्या कर्मचारी वर्गामुळे उपद्रवी लोकांवर लक्ष ठेवणे अतिशय कठीण जाते. कर्नाळा अभयारण्यात दोन विश्रामगृह असून ते पर्यटकांना राहण्यासाठी दिले जातात. याकरिता ठाणे कार्यालयातून आगावू बुकींग केली जाते. अनेक पर्यटक या ठिकाणी राहून सकाळी पक्षांच्या चिवचिवाटांचा आनंद घेतात. त्याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात रात्र घालवून एक वेगळी अनुभूती घेतात. मात्र थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हे दोनही विश्रामगृह बंद ठेवण्यात येतात. १९ ते ३१ डिसेंबर या दरम्यान कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. याचे कारण म्हणजे या कालावधीत पर्यटनासाठी नाही तर थर्टी फर्स्टनिमित्त पार्टी करण्याच्या उद्देशाने काही मंडळी अभयारण्यात येतात. या परिसरात मद्यप्राशन केले जाते. तसेच मोठमोठ्याने आवाज केला जातो. कधीकधी टेपरेकॉर्डर लावून हे झिंगलेले ही मंडळी संपूर्ण परिसर दणाणून सोडतात. याचा येथील पक्षी आणि प्राण्यांवर विपरीत परिणाम होतो. विविध जातींच्या पक्षांचे प्रिय माहेरघर असलेल्या या अभयारण्यात खर्या अर्थाने पोषक वातावरण निर्माण करुन देण्यात आले आहे. असे असले तरी वर्षअखेर सेलिब्रेशनच्या निमित्ताने या ठिकाणची शांतता भंग होऊ नये याकरिता उपाययोजना म्हणून तीन दिवस अभयारण्यात प्रवेश बंद ठेवण्यात आला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संपत पवार यांनी सांगितले. यापूर्वी धुलिवंदनाकरिता चार दिवस विश्रामगृह बंद ठेवण्यात आले होते. रिसॉर्ट आणि फार्महाऊसना नोटीसाकर्नाळा अभयारण्य परिसरातील रिसॉर्ट, उपहारगृह त्याचबरोबर फार्महाऊसेसना वनपरिक्षे कार्यालयाकडून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. साईकृपा, पॅनॉरोमिक, के.स्टार, क्षणभर विश्रांती या मोठ्या हॉटेलचा यामध्ये समावेश आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्याची सूचना देण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या काळात शांतता राखण्याची तंबी संबंधितांना देण्यात आली आहे. ------फोटो १९ कर्नाळा