काँग्रेसचा व्हेरायटी चौकात रास्ता रोको
By admin | Published: February 10, 2015 12:56 AM
फोटो आहे...
फोटो आहे... कार्यक र्त्यांना अटक : सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकांना मोठमोठी आश्वासने दिली. परंतु सत्तेत येताच भाजप-शिवसेना युती सरकारने जनविरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली. या विरोधात शहर काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी व्हेरायटी चौकात माजी मंत्री नितीन राऊ त, शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. काही वेळ चौकातील वाहतूक रोखल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आंदोलनात यात अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटवार, राजू व्यास, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके, जयंत लुटे, तानाजी वनवे, संजय दुधे, संजय दुबे, नगरसेविका निमिषा शिर्के, मालूताई वनवे, प्रेरणा कापसे, शीला मोहड, सिंधू उईके, पुष्पा निमजे, रेखा बाराहाते, सुरेश पिल्लेवार यांच्यासह शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकाने त्यांना अद्याप आर्थिक मदत दिलेली नाही. शेतकरी पॅकेजच्या नावाखाली तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. तसेच दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले. निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळण्यास युती सरकारने नकार देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे विकास ठाकरे म्हणाले. भूमी अधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. उद्योगपती व बिल्डर यांनाच या धोरणाचा लाभ होणार आहे. दुसरीकडे उद्योगपतींच्या भल्यासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना माफक दरात होणारा धान्यपुरवठा बंद केला आहे. वीजदरात वाढ करण्यात आली आहे. सवलतीत कपात करण्यात आल्याने सात हजार लघु उद्योजकांपुढे गंभीर संकट उभे ठाकल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.(प्रतिनिधी)चौकट....अटक व सुटकाशेकडो आंदोलकांनी स्वत:ला अटक करून घेतली. सर्वांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.