शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पोटनिवडणुकीतील ‘फिक्सिंग’वरून वादळ

By admin | Published: December 31, 2015 12:41 AM

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचा जावई, काँग्रेस नेते अजित जोगी आणि त्यांचे पुत्र अमित जोगी यांच्यादरम्यान टेलिफोनवर झालेल्या संभाषणाची आॅडियो टेप बाहेर आल्यामुळे

रायपूर/नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचा जावई, काँग्रेस नेते अजित जोगी आणि त्यांचे पुत्र अमित जोगी यांच्यादरम्यान टेलिफोनवर झालेल्या संभाषणाची आॅडियो टेप बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘फिक्सिंग’मध्ये या तिघांचाही समावेश असल्याचे या टेपवरून स्पष्ट होते.छत्तीसगडच्या अंतागड (अनुसूचित जमाती) मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मंतुराम पवार यांनी अगदी शेवटच्या क्षणाला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर पवार यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले होते. पवार हे त्यावेळी अजित जोगींचे विश्वासू मानले जात असत.पवार यांनी माघार घेण्यामागे पैशाचा व्यवहार झाल्याचे या आॅडियो टेपवरून उघड होते. त्यात अमित जोगी, रमणसिंग यांचा जावई पुनित गुप्ता, मंतुराम पवार आणि अजित जोगींचे माजी सहकारी फिरोज सिद्दीकी व अमिन मेमन यांच्यात झालेले संभाषण आहे.ही टेप जाहीर झाल्यानंतर राजकीय वादळ उठले आणि काँग्रेसने रमणसिंग यांना बडतर्फ करण्याची मागणी करीत या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्याचबरोबर अमित जोगी यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून सात दिवसांच्या आत उत्तर मागितले. तर भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावत हा प्रदेश काँग्रेसमधील ‘अंतर्गत लाथाळ्या’चा परिणाम असल्याचे स्पष्ट केले.रमणसिंग यांनीही आपल्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे आणि आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना या प्रकरणात ओढण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अजित जोगी यांनीही सर्व आरोप खोटे आहेत, असे स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)