शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

भारतातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीशाची प्रेरणा देणारी कथा, एकेकाळी न्यायालयासमोरच मागायची भीक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:58 IST

एकेकाळी न्यायालयासमोरच भीक मागणाऱ्या आणि आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी दिलेला लढा हा न्यायाधीश झालेल्या  तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) जोयिता मोंडल यांच्या कष्टाची आणि जिद्दीची पोचपावती देऊन जातो.

कोलकाता - एकेकाळी न्यायालयासमोरच भीक मागणाऱ्या आणि आपल्यासारख्याच इतरांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी दिलेला लढा हा न्यायाधीश झालेल्या  तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) जोयिता मोंडल यांच्या कष्टाची आणि जिद्दीची पोचपावती देऊन जातो. त्यांची ही वाटचाल अनेकांना प्रेरणा देणारीच आहे. जुलैमध्ये जोयिता मोंडल  न्यायाधीश झाल्या होत्या. उत्तर दिनाजपूर, इस्लामपूर न्यायालयात जोयिता मोंडल राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ‘विद्वान न्यायाधीश’ म्हणून कार्यरत आहेत

जोयिता मोंडल यांनी काल माध्यमांशी बोलताना आपल्या आठवणींना उजाळा दिला.  29 वर्षीय जोयंतो यांचा जन्म कोलकाता शहरात झाला. शाळेत त्यांचे जेंडर बद्दल असलेल्या शाळेच्या पूर्तता त्या करण्यास अपयशी ठरल्याने त्यांना इयत्ता 10 वी मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले होतं. 

जोयिता यांचा भिकारी तृतीयपंथी ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. एक तृतीयपंथी न्यायाधीश बनण्याचा क्षण तृतीयपंथीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा कौतुकाचा आहे. जोयितांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. केवळ विचारांच्या परिवर्तनामुळे आणि मनात असलेल्या जिद्दीमुळेच जीवन जगण्यासाठी भीक मागणे, भीक मागता मागता सामाजिक काम करणे आणि त्याचसोबत आपले शिक्षण सुरू ठेवणे, हे सगळे जोयिताने केले आहे. जोयिता या कोलकाता मध्ये होणाऱ्या भेदभावला कंटाळून उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आल्या आणि परत गेल्याच नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिजडा म्हणून काम करण्याबरोबर इतर तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी ही लढा दिला. त्यानंतर त्यांनी समाजातील प्रत्येक भेदभाव होणाऱ्या व्यक्तीसाठी लढा उभारला. त्यांनी या सर्व कामांसोबत आपले मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले.2010 साली त्यांना आपले मतदान कार्ड मिळाले. आपल्या जिल्ह्यात मतदान कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी होत्या.

काही वर्षांपूर्वी जोयिता यांनी समाजातील वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी स्वतःची एक संस्थाही चालू केली. जिल्यातील हजारो व्यक्तींना त्यांची संस्था मदत पोहोचवते. आतापर्यंत मिळालेल्या यशा व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या तृतीयपंथीपणामुळे हॉटेल मध्ये रूम न मिळाल्यामुळे बस स्टँड वर झोपावं लागल्याच्या वाईट स्मृतींना मुलाखतीत उजाळा दिला. कोलकाता येथील घर सोडल्यानंतर 10 वर्षांनी आता जुलैमध्ये जॉईता यांची दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. 

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी त्या झोपत असलेल्या बस स्टँड पासून त्यांची निवड झालेले न्यायालय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. असे त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलखातीत म्हटले आहे. 8 जुलै या दिवशी जॉईता यांना इस्लामपूर सब-डिव्हिजनल लीगल सर्व्हिस कमिटीने न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतर तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला येऊ न देण्यासाठी जोयिता नेहमी प्रयत्नशील असतात.जॉईतांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माझ्या यशाबद्दल मला अभिमान आहे. न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. तृतीयपंथी समाजातील 2-3 टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळावून देता आल्या तर मला माझ्या पदाबद्दल समाधान वाटेल. कारण इतर जे तृतीयपंथी 100-200 रुपयांसाठी सेक्स वर्कर्सचं काम करतात, त्यांनाही या त्रासापासून मुक्तता मिळेल व ते सुखाची झोप घेऊ शकतील.’ त्या पुढे बोलताना म्हणाल्या की ‘मी जरी आता वातावणूकुलीत गाड्यामध्ये फिरत असले तरी माझ्या समाजातील इतर तृतीयपंथीना दिवसा भीक आणि सेक्स वर्कर्स म्हणूनच काम करावे लागत आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय