कोरोना काळात अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त झाले. पण आता अनेक लोक कोरोना काळात बरे होऊन पुढे जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कुशल भारती. कुशल हा यूपीच्या उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांनी रस्त्याच्या कडेला एका हातगाडीवर 'बी.टेक चायवाला' नावाने स्टॉल सुरू केला आहे. या स्टॉलची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
कुशल म्हणतो, कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं, फक्त तुमची मेहनत आणि समर्पण महत्त्वाचे असते. वास्तविक, शहरातील सिव्हिल लाईनमध्ये राहणाऱ्या कुशल भारतीने शहरातील छोट्या चौकात बीटेक चाय वाला या नावाने स्टॉल सुरू केला आहे. स्टॉल सुरू करून दोन महिने झाले. लोकांकडून खूप पाठिंबा मिळत असल्याचं कुशल सांगतो. कुशलने दिलेल्या माहितीनुसार, "2002 मध्ये त्याने बीटेक केले आणि कॅम्पस सिलेक्शनमध्ये प्लेसमेंट मिळवली."
"अनेक कंपन्यांमध्ये कामही केले, सर्व काही ठीक चालले होते. पण जेव्हा कोरोनाचा काळ आला तेव्हा कंपनीने पगार अर्धा केला. मला ही गोष्ट आवडली नाही आणि नोकरी सोडून उन्नावला आलो. उन्नावमध्ये आल्यानंतर त्यांनी कानपूरमध्येही नोकरी केली पण समाधान नाही." ऑटो मोबाईल क्षेत्रात नशीब आजमावलं, पण अनुभव नसल्याने तो अपयशी ठरला आणि जमा झालेले भांडवलही संपले, असे कुशल सांगतो.
अशा परिस्थितीत मुलांची फी आणि घरखर्च चालवणे कठीण झाले आहे. कुशल सांगतो की, आम्ही मिलेनियर नावाचा चित्रपट पाहिला होता, त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही बीटेक चायवाला नावाचे दुकान उघडले. यापेक्षा कमी पैशात चांगले काम होऊ शकले नसते, असेही तो म्हणाले. सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं पण आता सवय झाली आहे. लोकांचा पाठिंबाही मिळत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"