काही दिवसापूर्वी लखनौमध्ये एक बँक लुटली. या लुटल्याप्रकरणी एक रंजक बाब समोर आली आहे. चोरट्यांनी गोल्ड लोन लॉकरला हात न लावता ४२ सामान्य लॉकर्स फोडून कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरून लंपास केले. चोरट्यांना बँकेच्या आतील नकाशा आणि लॉकर रूमची माहिती होती. या दरोड्यात बँक कर्मचाऱ्याचा हात असावा, असा पोलिसांना संशय आहे.
बँक आणि ग्राहक दोघांकडे गोल्ड लोन लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा तपशील असतो. पण बँकेकडे सामान्य लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा तपशील नसतो. त्यामुळे चोरट्यांनी सामान्य लॉकरवर डल्ला मारला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बँकेचा अलार्म गेल्या १५ दिवसांपासून स्लीपिंग मोडमध्ये होता, त्यामुळे दरोड्याच्या वेळी अलार्म वाजला नाही. लखनौचे संयुक्त पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था अमित वर्मा म्हणाले की, हा एक मोठा मुद्दा असून त्याची चौकशी केली जाईल. या प्रकरणाची सर्व बाजूंनी कसून चौकशी केली जात आहे.
बँकेचे माजी व्यवस्थापक अशोक कुमार म्हणाले की, लॉकर रूममध्ये फक्त वरिष्ठ कर्मचारी किंवा ये-जा करणाऱ्यांनाच लॉकर्सची माहिती असते. बँकेतील काही कर्मचाऱ्याने या गैरप्रकारांना मदत केली असावी, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, या प्रकरणी एसीपी विभूतीखंड राधा रमण यांनी सांगितले की, बँकेत एकूण ९० लॉकर होते, त्यापैकी ७० सुरू आहेत. चोरट्यांनी ४२ फोडले असून त्यापैकी ४० लॉकर्स सुरू आहेत. बँक गोल्ड लोन लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा तपशील ठेवते आणि त्यांची व्हिडिओग्राफी देखील करते. सध्या लखनौच्या चिन्हाट येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या दरोड्यातील बहुतांश गुन्हेगार पकडले आहेत. या चकमकीत दोन जण ठार झाले आहेत. चोरट्यांकडून लुटलेला माल जप्त करण्यात आला आहे. लुटमारीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या फुटेजमध्ये तीन चोरटे दिसत आहेत. बँकेत घुसून ४२ लॉकर फोडून दागिने लंपास केले.
या घटनेनंतर चिन्हाट शाखेत झालेल्या दरोड्याबाबत इंडियन ओव्हरसीज बँकेचे अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. बँकेने सांगितले की, या दुर्दैवी दरोड्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि २४ तासांच्या आत संशयितांना अटक करण्यासाठी पोलिस आणि स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे कृतज्ञता व्यक्त करते.
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या माहितीनुसार, ही घटना पुरेशी सुरक्षा उपाय असूनही घडली आहे, पण ती आपल्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. बँक सध्या सुरू असलेल्या पोलिस तपास प्रक्रियेस सहकार्य करत राहील आणि अधिकाऱ्यांना शक्य ते सर्व मदत करण्यास वचनबद्ध आहे.