शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

रणनिती शहा! विरोधकांवर प्रखर हल्लाबोल, सहयोगी दलाशी घेतले नमते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 7:16 AM

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अमित शहा हेच भाजपचे खरे सूत्रधार राहिले आहेत.

विकास झाडे / सुरेश भुसारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रत्येक राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यावर हल्लाबोल करून विरोधकाला नामोहरम करण्याची आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यापुढे नमते घेण्याची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची योजना यशस्वी झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अमित शहा हेच भाजपचे खरे सूत्रधार राहिले आहेत.शरद पवार लक्ष्यमहाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ही एक शक्ती आहे. या शक्तीला तडे दिल्यास भाजपचा मार्ग मोकळा होईल, हे स्पष्ट होते. यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या परिवारावर प्रचाराचा फोकस केला होता. याचे परिणाम दिसून आले आहे.शिवसेनेसाठी शांतीदूतएका टप्प्यावर शिवसेनेसोबत कटुता निर्माण झाल्यानंतर सेना-भाजप युती व्हावी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचे रणनितीकार आणि जदयुचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांना चर्चेला पाठविले. ही चर्चाच दोन्ही पक्षात युती होण्याचे फलित ठरले. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेक चर्चा झाल्या. मतदानाच्या सातव्या फेरीनंतर अमित शहा यांनी एनडीएच्या सदस्यांसाठी स्नेहभोजन ठेवले होेते त्यात ठाकरे यांना सन्मानाची वागणूक मिळाली.

ममतांवर आघातपश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टोकाचा हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या दोन्ही नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेचा फोकस ठेवला होता. याचा परिणाम भाजपला दुसऱ्या क्रमाकांच्या जागा मिळण्यात झाला.सपा-बसपावर टीकास्त्रउत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसची फारशी शक्ती नसल्याने सपा व बसपाच्या व्होट बँकेवर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली. याचा परिणाम उत्तरप्रदेशातही भाजपला ५८ जागा मिळविण्यात भाजपला यश आले आहे.

सहयोगी दलाला महत्व!निवडणुकीच्या काळात अमित शहा यांनी सहयोगी दलाला दिलेले महत्व हे भाजप व एनडीएच्या जागा वाढविण्यास महत्वाचे ठरले. बिहारमध्ये भाजपने १७ जागा लढविल्यात. जदयुकडे १७ तर रामविलास पासवान यांना ६ जागा दिल्यात. जेवढेही सहयोगी पक्ष होते त्यांचे उमेदवार हे ‘भाजपचेच उमेदवार आहेत’ ही भूमिका ठेवून शहा हे स्वत: राबलेत आणि कार्यकर्त्यांची फळी सहयोगी पक्षाच्या उमेदवारामागे लावली. यातूनच त्यांना २०१९चे घवघवीत यश मिळाले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९