देशभरातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करा पेशावरच्या घटनेचे पडसाद : केंद्राचे राज्यांना निर्देश
By admin | Published: December 18, 2014 12:40 AM
नवी दिल्ली-पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शाळकरी मुलांवर झालेल्या निर्दयी हल्ल्यानंतर देशातील शाळांमध्ये संरक्षण व्यवस्था वाढविण्याचे व मजबूत करण्याचे निर्देश केंद्राने तातडीने राज्यांना दिले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी ब ोलताना, राज्य सरकारांना राज्यातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविणे व अधिक भक्कम करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.
नवी दिल्ली-पाकिस्तानच्या पेशावरमध्ये शाळकरी मुलांवर झालेल्या निर्दयी हल्ल्यानंतर देशातील शाळांमध्ये संरक्षण व्यवस्था वाढविण्याचे व मजबूत करण्याचे निर्देश केंद्राने तातडीने राज्यांना दिले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी ब ोलताना, राज्य सरकारांना राज्यातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविणे व अधिक भक्कम करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत दहशती हल्ल्यानंतर मुलांच्या सुटकेची योजना, ओलीस ठेवले जाण्याला प्रतिबंध घालण्याचे उपाय व संकट काळी दरवाजे व शाळेचे मुख्य फाटक बंद करणे अशा अनेक प्रसंगांकरिता योजना आखण्यात येणार आहेत. २०१० मध्ये गृह मंत्रालयाने शाळांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. या सूचना मुंबईतील दहशती हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला अमेरिकेत अटक झाल्यानंतर जारी करण्यात आल्या होत्या. या सूचनांची फेरतपासणी करून विद्यमान परिस्थिती लक्षात घेता त्यात काही नव्या सूचना समाविष्ट होणार असून काही बदलही केले जाणार आहेत असे ते पुढे म्हणाले. काही शाळांना विशेष निर्देश दिले जाणार असून सुरक्षा सरावासाठी त्यांना स्थानिक पोलीस व प्रशासनासोबत समन्वय साधण्यास सांगितले जाणार आहे. दिल्ली व मुंबईतील काही मुख्य शाळा तसेच उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातील काही निवासी शाळांना विशेष सुरक्षा देण्यात येण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. देशभरात पडसादपाटण्यातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविलीपाटणा- येथील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून पोलिसांनी शिक्षण संस्थांना शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सांगितले आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र राणा यांनी, शाळा व अन्य शिक्षण संस्थांजवळ पोलीस दलाला तैनात केल्याचे सांगितले. तसेच शाळांजवळ असलेल्या पोलीस ठाण्यांत शाळांमधून मुलांना घरी नेण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांचे चालक व वाहकांची माहिती नोंदविण्यास सांगितली आहे. येथील अनेक शाळांमध्ये बुधवारी पाकिस्तानात तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या निरपराध मुलांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वडोदरातील विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजलीयेथील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तालिबानी हल्ल्यात ठार झालेल्या शाळकरी मुलांना श्रद्धांजली वाहिली. अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्राच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काळे बिल्ले लावून अपला निषेध नोंदविला. श्रीनगरमध्ये जामिया मशिदीत प्रार्थना येथील हुरियत कॉन्फरन्सच्या मीरवाईज उमर फारूक यांच्या नेतृत्वात केलेल्या शांततापूर्ण निषेध आंदोनलात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी येथील जामिया मशिदीत ठार झालेल्या मुलांकरिता प्रार्थना करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हाती काळे झेंडे घेऊन आपला निषेध नोंदवला. इस्लाममध्ये दहशतवादाला जागा नाही असे मीरवाईज यांनी यावेळी म्हटले. हा हल्ला एक भ्याड हल्ला असून त्याचा इस्लाम व जिहादशी काहीही संबंध नाही. या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांनी इस्लाम या धर्माची बदनामी केली आहे असे ते म्हणाले. प्रतिक्रियाहा हल्ला मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा गुन्हा आहे. कोणताही धर्म अशा प्रकारच्या कृत्याची परवानगी देत नाही. अशा घटना जगात कुठेच घडू नयेत. मुले ही देवदूतासारखी असतात. त्यांचे कुणाशीच वैर नसते. या मुलांच्या पालकांना जे दु:ख झाले असेल ते मी समजू शकतो. शिवराजसिंग चौहान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री.ज्यांनी या निष्पाप मुलांना ठार केले त्यांना अल्ला कधीच माफ करणार नाही. ही माणसे स्वत:ला मुसलमान कसे म्हणवतात? त्यांची अल्लाचे नाव घेण्याची हिंमत कशी होते? पाकिस्तानात जे घडले त्याविषयी दु:ख व्यक्त करण्यास शब्द अपुरे आहेत. केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्लाकेरळ विधानसभेने केला निषेधकेरळ विधानसभेने पाकिस्तानातील शाळकरी मुलांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. उपसभापती एन.सकथान यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया नोंदविली व सदस्यांनी मौन राखून या मुलांना श्रद्धांजली वाहिली.तालिबान्यांच्या विकृत व अमानुष मनाचे दर्शन घडविणारी घटना अशा शब्दात सीपीआयने (एम) आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी भारत व पाकने परस्परांना सहकार्य केले पाहिजे असे म्हटले आहे.