ऑनलाइन लोकमत -
रोहतक, दि. 19 - हरियाणामधील रोहतकमध्ये जाट समाजाच्या आरक्षणावरुन तणाव वाढत चालला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून रोहतकमध्ये 15 जण जखमी झाले आहेत. निदर्शनादरम्यान पोलिसांवरदेखील हल्ला करण्यायात आला. पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फो़डण्यात आल्या आहेत.
सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर हरियाणा सरकारने झज्जर आणि रोहतकमधील इंटरनेट सेवादेखील बंद केली आहे. तसंच जमावबंदीचा आदेशदेखील लागू करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली - अंबाला रेल्वेमार्ग बंद केला असून गुडगावमध्येदेखील आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
जाट समजाला ओबीसी अंतर्गत सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी याप्रकरणी सर्वपक्षीय बैठदेखील बोलावली होती. याप्रकरणी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, 31 मार्चपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करेल अशी माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिला आहे.
#JatReservation row: Jat agitation continues at Sampla (Haryana) pic.twitter.com/wopdF6I1gJ— ANI (@ANI_news) February 19, 2016
#JatReservation row: Trucks stranded near Rohtak bypass as Jat agitation continues in Haryana pic.twitter.com/AW1tWcS9q3— ANI (@ANI_news) February 19, 2016