शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

हिंसक गोरक्षकांवर होणार कठोर कारवाई, पंतप्रधान मोदींचा इशारा

By admin | Published: July 16, 2017 1:39 PM

गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गोरक्षेची भावना आहे. मात्र हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी हा इशारा दिला आहे. 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मोदींनी गोरक्षकांसह विविध मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट केले. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, " मोदींनी हिंसक गोरक्षकांबाबत कठोर भूमिका घेतली आहे, ते म्हणाले की, देशात गोरक्षेबाबत भावना आहे. मात्र गोरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्य सरकारांनी हिंसक गोरक्षकांवर कारवाई करावी." गेल्या काही काळापासून गोरक्षकांकडून गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अनेकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच त्यात अनेकांचा बळीसुद्धा गेला आहे. याआधीही मोदींनी साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असे म्हटले होते. अधिक वाचा
 
(नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले )( गोरक्षक मोकाट! गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अजून एकाची हत्या )(गोरक्षकांची आता काश्मीरमध्येही झुंडशाही )दरम्यान, मोदींनी या बैठकीत देशात जीएसटी यशस्वीरीत्या लागू झाल्याबद्दल सर्व पक्षांचे अभिनंदन केले. तसेच पूर्वोत्तर भारतात आलेल्या पुराबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. तसेच 9 ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाच्या 75व्या वर्धापन दिनी संसदेत चर्चा व्हायला हवी, असा प्रस्तावही मोदींनी ठेवल्याचे अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.