विकास झाडे लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दररोज २५ हजारांवर नवे कोरोनाबाधित येत आहेत. हा प्रकोप असाच राहिला, तर आरोग्य व्यवस्था सांभाळणे अशक्य होणार असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या सोमवारपर्यंत दिल्लीत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर केजरीवालांनी दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. दिल्लीतील २ कोटी लोक एकत्र येऊन लढा देऊ आणि या चौथ्या लाटेसही आपण थोपवून धरू. हम होेंगे कामयाब... असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
कोणत्या राज्यातकाय निर्बंध n तामिळनाडूत रविवारी पूर्ण लॉकडाऊन आहे. इतर दिवशी काही प्रमाणात सूट आहे. उत्तर प्रदेशातही रविवारी संचारबंदीआहे.n ५०० पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी आहे. कर्नाटकात लोकांना एकत्र येण्यास निर्बंध आहेत.n केरळात रात्री ९ वाजता दुकाने बंद करण्याचे निर्देश आहेत. मध्यप्रदेशातही रात्रीची संचारबंदी आहे. गुजरात, हरयाणा, चंदीगड, पंजाब, ओडिशातही रात्रीची संचारबंदी आहे.
उत्तर प्रदेशमध्ये चार शहरांत लॉकडाऊनकोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला वाराणसी, कानपूरनगर, गाेरखपूर आणि अलाहाबादेत एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला.
पंजाबमध्ये कठोर निर्बंधपंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी तासभराने वाढवण्यासह बार्स, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, स्पा, शिकवणी वर्ग, क्रीडा संकुलांवर ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध सोमवारी लागू करण्यात आले.तेलंगणलाही आदेशकोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्यामुळे लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा निर्णय ४८ तासांत घ्यावा, असा आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिला.
रात्रीची संचारबंदीबिहारमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रात्री नऊ ते पहाटे पाच अशी संचारबंदी लागू केली आहे. राजस्थानात संचारबंदी राजस्थानात १९ एप्रिलपासून ३ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढते रुग्ण रोखण्यासाठी निर्णय घेतला.