पाटणा, दि. 12 -बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी बुधवारी सचिवालयाच्या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केल्याची घटना घडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तेजस्वी यादव बाहेर आले त्यावेळी हा प्रकार घडला.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीमुळे सध्या अडचणीत ते अडचणीत सापडले आहेत. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी बाहेर ताटकळत उभे होते. त्यामुळे तेजस्वी यादव सचिवालयातून बाहेर पडतात प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केली. तेव्हा तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी एका कॅमेरामन आणि वृत्तवाहिनीच्या एका प्रतिनिधीला अक्षरश: धक्के मारून तेथून दूर केले. साहजिकच या प्रकारामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रचंड संतापले. या सर्व प्रकारामुळे पुन्हा तेजस्वी यादव यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
Tejashwi Yadav"s security personnel manhandle mediapersons, ANI reporter pushed asideRead @ANI_news story | https://t.co/W2MVY1S358pic.twitter.com/Q9cSuHgEzB— ANI Digital (@ani_digital) July 12, 2017
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सीबीआयने कारवाई केल्यापासून बिहारमधील महाआघाडीला हादरे बसू लागले आहेत. आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तेजस्वी यादव यांच्या भवितव्याबाबत राष्ट्रीय जनता दलाने पुढील चार दिवसांत निर्णय घ्यावा, असे अल्टिमेटम नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला दिला होता. त्यामुळे महाआघाडीमधील दुरावा अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.