हैदराबाद - तेलंगणासारखी मजबूत आरोग्य व्यवस्था असलेले दुसरे राज्य नाही, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काढले. मंत्रिमंडळाने ३४ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना दिलेल्या मंजुरीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री राव म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाने तेलंगणामध्ये ३४ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. देशात असे अन्य कोणत्याही राज्यात नाही.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आता २६ वर पोहोचली असून पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणखी आठ महाविद्यालये सुरू होणार आहेत. यावेळी केसीआर यांनी राज्यात विविध ठिकाणी नऊ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे ऑनलाइन उद्घाटन केले. ते म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा तेलंगणाची स्थापना झाली आणि भारत राष्ट्र समिती सत्तेवर आली तेव्हा वैद्यकीय जागांची संख्या फक्त २,८५० होती आणि आता ही संख्या ८,५१५ आहे. पुढील वर्षी शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांसह आठ नवीन महाविद्यालये सुरू झाल्यानंतर दरवर्षी १०,००० डॉक्टर तयार होतील