नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं हळूहळू पूर्ण जगाला विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. भारतातही या रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. तसेच देशात कोरोनानं दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनाचं नाव ऐकल्यावरच लोकांचा थरकाप उडत आहे. उत्तर प्रदेशमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधल्या संतकबीरनगरमधल्या रुग्णालयात सर्दी आणि खोकला झालेली विद्यार्थिनी आल्यानंतर डॉक्टरांनी खुर्ची सोडूनच पळ काढला. खरं तर तीन फेब्रुवारीला एक विद्यार्थिनी चीनहून परतली होती. जिथे कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. विद्यार्थिनीला परतल्यानंतर 28 दिवसांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. त्यानंतर तिला कोरोना व्हायरसचं संक्रमण नसल्याचं समोर आलं. काही दिवसांनंतर साधारण सर्दी आणि खोकल्यावरचे उपचार घेण्यासाठी ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तिनं चीनहून एमबीबीएसचा अभ्यास करून परतल्याचं सांगितल्यानंतर डॉक्टरांनी थेट खुर्ची सोडूनच धूम ठोकली.Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वररुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी याची सूचना रॅपिड रिस्पॉन्स टीमला दिली. त्यानंतर टीमनं तात्काळ घरी पोहोचून विद्यार्थिनीची तपासणी केली, तेव्हा तिच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. तरुणीनं सांगितलं की, डॉक्टरला चीनहून परतल्याचं सांगितल्यानंतर तो खुर्ची सोडून पळून गेला. तसेच जिल्ह्याचे सीएमओ हरगोविद सिंह यांनी सांगितलं की, जेसुद्धा लोक परदेशातून परतलेले आहेत, त्यांना 28 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं होतं.
Coronavirus : शहरांमधील शाळा, कॉलेज, मॉल्स, कोचिंग क्लास ३१ मार्चपर्यंत बंद, प्रतिबंधासाठी कडक उपाय बंगळुरूमध्येही इटलीहून हनिमून करून आलेल्या दाम्पत्यामधील पतीला कोरोना व्हायरसचं संक्रमण आढळून आल्यानंतर दहशत पसरली होती. तीसुद्धा त्याला सोडून आग्र्याला माहेरी निघून गेली. इटलीहून परतल्यानंतर पती-पत्नीला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेहून सहा दिवसांपूर्वी एक व्यक्ती नागपुरात आली होती. या व्यक्तीची तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याची पत्नी आणि निकटवर्तीयालाही कोरोनाची लागण झाली आहे. या पहिल्याच रुग्णासोबत विमानप्रवास केलेल्या आणि त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या आणखी चार जणांचे नमुनेही तडकाफडकी तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आज आणखी एका रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं नागपुरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा चारवर पोहोचला आहे.
Coronavirus : देशात 100हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण; भारतानं पाच देशांच्या सीमा केल्या बंद
नागपुरातल्या संशयितांपैकी दोघांचा बाहेरील देशातून प्रवासयात ३६ वर्षीय महिला नेदरलँड येथून प्रवास करून आली होती. तिच्यासोबत चार वर्षाचा मुलगा आहे. या मुलाला सर्दी-खोकला असल्याने ती मेयोमध्ये आली. दुसरा संशयित रुग्ण हे ५० वर्षीय आहे. ते थायलँडला गेले होते. तर, इतर दोन संशयितांपैकी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १९ वर्षीय विद्यार्थी तर दुसरी ६० वर्षीय महिला आहे. ती कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करते. अचानक हे चारही रुग्ण कुणाला न सांगताच निघून गेल्याचे कळताच गोंधळ उडाला. डॉक्टरांनी याची माहिती अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व तहसील पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतु त्यांनी वॉर्डात पॉझिटिव्ह रुग्ण आहे, आम्हालाही कोरोनाची लागण होऊ शकते, असे सांगून रुग्णालयात येण्यास नकार दिला. शनिवारी ही घटना बाहेर येताच, मेयोमध्ये सुरू असलेल्या गलथानपणा समोर आला.