- नितीन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर वाढत असतानाच महाराष्ट्रात २४ जानेवारीपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे आरोग्य तज्ज्ञ व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. शाळेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या पालकांची सुरक्षा खूपच महत्त्वाची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.तथापि, डॉ. पॉल यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर थेट टिप्पणी केली नाही. ते म्हणाले शाळा उघडण्याचा निर्णय आपत्तीची स्थिती लक्षात घेऊन केला जातो. राज्य सरकारने सर्व पैलूंचा विचार करून हा निर्णय घेतला, असेल तर यावर आम्ही कोणतीही टिप्पणी करणार नाही. केंद्र सरकार वेळोवेळी राज्य सरकारांना निर्देश देत आहे. महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. २० जानेवारी रोजी महाराष्ट्रात संक्रमण दर २२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची; महाराष्ट्रात शाळा उघडण्यावर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 6:54 AM