स्पर्धेत डावल्याने विद्यार्थाचा संताप
By admin | Published: January 10, 2016 11:28 PM
जळगाव : युवारंग स्पर्धेच्या निकालात वशीलेबाजी झाली असून आपल्याला बक्षिसापासून डावलण्यात आल्यामुळे युवकाने बक्षिस वितरण कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाला सुरक्षित ठिकाणी हलवत वाद मिटविण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडली.
जळगाव : युवारंग स्पर्धेच्या निकालात वशीलेबाजी झाली असून आपल्याला बक्षिसापासून डावलण्यात आल्यामुळे युवकाने बक्षिस वितरण कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाला सुरक्षित ठिकाणी हलवत वाद मिटविण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडली.महोत्सवातील स्पर्धांमध्ये ठराविक महाविद्यालयांच्या स्पर्धकांनाच बक्षिस मिळत आहे. व संबंधित संघ नाव घोषित होण्यापूर्वीच रंग मंचासमोर दाखल होत जल्लोश करत असल्यामुळे निकालात वशीलेबाजी झाल्याचा संशय आल्याने एम.एस.डब्लू. महाविद्यालय मोराणा जिल्हा धुळे महाविद्यालयाचे विद्यर्थी तक्रार करण्यासाठी आयोजकांकडे जात गोंधळ घालत असतांनाच मंचा जवळ उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी त्याला आवरत जवळच्या एका कक्षात घेवून गेले. या कक्षात काही वेळ किशोर जाधव व नितीन पाटील या विद्यार्थांना डांबून ठेवण्यात आले.दरम्यान, विद्यार्थ्याने गोंधळ घालता उपस्थित कर्मचारी व पोलीसांकडून युवकांसोबत मारहान झाल्याचे सांगण्यात आले.विद्यर्थ्याने काव्य प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र आपल्यापेक्षा हलके सादरीकरण करणार्या स्पर्धकाला बक्षिस मिळल्याचा आरोप युवकांनी केला आहे.मात्र याबाबत विद्यार्थ्यांनी युवारंग आयोजन समितीकडे तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना काही व्यक्तींकडून समजावण्यात आले. यानंतर युवक माघारी परतले.