नवी दिल्ली : नागरी सेवा अॅप्टिट्यूड टेस्टची (सीसॅट) अंमलबजावणी केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०११ साली झालेल्या प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्याचा निर्णय केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवेतील प्राथमिक परीक्षांसाठी ‘सीसॅट’ किंवा पेपर दोनच्या निर्णयामध्ये बदल करण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. तसेच २०११ मध्ये नागरी सेवांसाठी झालेल्या परीक्षेसाठी ‘सीसॅट’च्या चिंतेमुळे जे विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्यासाठी केंद्राने अनुकूल पाऊल उचलले असून २०११ साली ‘सीसॅट’ची अंमलबजावणी झाली तेव्हा परीक्षेसाठी अर्ज केलेल्या, परीक्षेला उपस्थित, अनुपस्थित उमेदवारांनाही पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)
‘त्या’ विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
By admin | Published: August 21, 2015 10:27 PM