काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली. प्रयागराजमधील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसोबत यूपी सरकार आणि आयोगाचे वर्तन असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली. सामान्यीकरणाच्या नावाखाली परीक्षा प्रक्रियेतील गैरपारदर्शकता मान्य करता येणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
एकाचवेळी परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका विद्यार्थ्यांनी का सोसावा? यातून छळ होत असल्याचे राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुर्गम भागात राहून काबाडकष्ट करणाऱ्या तरुणांवर हा अन्याय सहन केला जाऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. स्पर्धक विद्यार्थ्यांच्या मागणीला काँग्रेस पक्ष पूर्ण पाठिंबा देत आहे, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, हुकूमशाही पद्धतीने विद्यार्थ्यांचे लोकशाही हक्क दडपले जाऊ शकत नाहीत.
यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील व्यवस्थेबाबत प्रयागराज आणि इतर भागात विद्यार्थ्यांचा विरोध सुरू असताना हे विधान आले आहे. राहुल गांधींचे हे विधान विरोधी पक्षांसोबतच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणखी एक पाऊल मानले जात आहे.