शहरं
Join us  
Trending Stories
1
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
3
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
4
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
5
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
6
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
7
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
8
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
9
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
10
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
12
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
13
"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?
14
Gold Silver Rate Today : लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दर घसरले; ₹५००० पर्यंत कमी झाला सोन्याचा भाव
15
IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)
16
सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
17
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
19
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
20
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र

विजेच्या धक्क्याने विद्यार्थी गंभीर जखमी

By admin | Published: February 02, 2016 12:15 AM

जळगाव : पारीख पार्कजवळील आदिवासी वस्तीगृहात कुलरचे पाणी घेण्यास गेलेल्या फिरोज सिकंदर तडवी (१९, रा. परसोड, ता. यावल) या विद्यार्थ्यास विजेचा जबर धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

जळगाव : पारीख पार्कजवळील आदिवासी वस्तीगृहात कुलरचे पाणी घेण्यास गेलेल्या फिरोज सिकंदर तडवी (१९, रा. परसोड, ता. यावल) या विद्यार्थ्यास विजेचा जबर धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
सोमवारी रात्री पाणी पिण्यासाठी फिरोज पाण्याच्या कुलरजवळ गेला व पाणी घेण्यासाठी कुलरला हात लावताच त्याला जबर झटका बसून तो दूर फेकल्या गेल्या व बेशुद्ध झाला. त्यावेळी इतर विद्यार्थ्यांनी धाव घेऊन त्याला तत्काळ प्रभात चौकानजीकच्या खाजगी रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून रुग्णालयात ४० ते ४५ विद्यार्थी थांबून होते.

विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर..
या आदिवासी वस्तीगृहात २८० विद्यार्थी राहतात. तेथे पिण्याच्या पाण्यासाठी एक कुलर ठेवण्यात आले असून या कुलरचा नेहमीच विजेचा धक्का लागतो व त्या बाबत वारंवार गृहपाल पाटील यांना सांगितल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही व आज एका विद्यार्थ्यास जबर धक्का बसला, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

गृहपाल राहतात दुसरीकडे...
आदिवासी वस्तीगृहाचे गृहपाल या ठिकाणी न राहता शहरात दुसर्‍याठिकाणी राहत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे ऐनवेळेवर गंभीर प्रसंग ओढावला तर विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास येथे कोणीच नसते. अशाच प्रकारे सोमवारी रात्रीदेखील विद्यार्थ्यांनीच जखमीला दवाखान्यात हलविले व नंतर गृहपाल दवाखान्यात पोहचले.