शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

वसतिगृहाला सांडपाण्याचा वेढा दुर्गंधीमुळे विद्यार्थी त्रस्त : आवारातच सोडले शौचालयाचे पाणी

By admin | Published: January 31, 2017 2:06 AM

कोराडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे.

कोराडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे.
नांदा-कोराडी येथे समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी नागपूर शहरात शिक्षण घेणारे १०० विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील शौचालयाच्या व सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक अंतर्गत टँक बांधली असून याच टाकीत आंघोळीचे व शौचालयाचे पाणी सोडले जाते. टाकीची क्षमता कमी असल्याने ती वारंवार ओव्हर फ्लो होते. महिनाभरापासून ही टाकी भरली असल्याने घाणयुक्त सांडपाणी बाहेर पडते. वसतिगृहाने हे दुर्गंधीयुक्त पाणी चक्क आवारातील परसबागेत सोडून स्वच्छतेचा पराक्रम केला. वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आत असलेल्या बागेत पाणी सोडल्याने तेथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या सांडपाण्यावर अळ्या तरंगताना दिसतात.
वसतिगृहालगत राहणारे बापू बावनकुळे, हेमराज चौधरी, आशिष राऊत, यशवंत खडतकर, साहेबराव सावरकर, खुशाल बेहुने, रवी चौधरी, फकीरचंद बोरकुटे, विजय विटोले आदी कुटुंबीयांना येथे राहणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना दुर्गंधीतच दिवस काढावे लागत आहेत. वाच्यता करण्याचे धाडस नसल्याने हे विद्यार्थी हा अन्याय सहन करीत आहेत. वसतिगृह सुरू झाल्यापासून नागरिकांना अनेकदा हा त्रास सहन करावा लागत आहे. गृहपालाकडे अर्ज-विनंती केली, मोर्चे काढले परंतु समस्या सोडविण्यात यश आले नाही.
ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधली आहे. बांधकाम करताना सांडपाणी व शौचालयाच्या पाण्याची विल्हेवाट लागेल, अशी पुरेशी व्यवस्था नाही. चार वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत छत गळती होते. २४ जून २०१६ ला समाजकल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्यांनाही ही समस्या दाखविण्यात आली. अत्यंत किळसवाणा प्रकार पाहिल्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास तशा सूचना केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.