अहमदाबाद : गुजरात सरकारने सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या मागासांना (ईबीसी) १० टक्के आरक्षणाची घोषणा केल्यानंतर तुरुंगात असलेले पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी कुठलाही समझोता करण्यापूर्वी आरक्षण निर्णयाचा अभ्यास करण्यात येईल, असे शनिवारी स्पष्ट केले.दुसरीकडे सरकारसोबत चर्चेत सहभागी समुदायाच्या नेत्यांनी दोन मुख्य मागण्या मान्य झाल्या असल्याचे सांगून पटेल आंदोलन संपुष्टात आणण्यावर भर दिला आहे. हार्दिक पटेल यांनी येथून ९० किमी अंतरावरील मेहसाणा जिल्ह्याच्या विसनगरमधील एका न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी सर्वप्रथम सरकारने घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करील आणि हा निर्णय खरोखरच समुदायाच्या बाजूने असल्यास निश्चितपणे समझोता करू. हार्दिक पटेल न्यायालयीन कोठडीत आहेत. (वृत्तसंस्था)
‘समझोत्यापूर्वी ईबीसी आरक्षणाचा अभ्यास करू’
By admin | Published: May 02, 2016 12:02 AM