शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महामृत्युंजय' मंत्राच्या जपाने रुग्णांना मिळतंय 'जीवदान'? आरएमएलमध्ये होतेय संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 1:48 AM

येत्या दोन महिन्यांत या संशोधनाचा अंतिम निष्कर्ष कळणार आहेत.

नवी दिल्ली : गंभीर आजारावर वैद्यकीय उपचार करण्याबरोबरच अनेकदा आस्थेने महामृत्युंजय मंत्राचा जप रुग्ण करतात. या मंत्राचा जप केल्याने खरंच रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? याचे संशोधन डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर करत आहेत. या मंत्राप्रति लोकांच्या श्रद्धा व विश्वासाला विज्ञानिक दृष्टीने सिद्ध करण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे. मेंदूचे विकार असलेल्या रुग्णांना हा मंत्र ऐकवण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

येत्या दोन महिन्यांत या संशोधनाचा अंतिम निष्कर्ष कळणार आहेत. आरएमएलमधील न्यूरोसर्जन डॉ. अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची टीम याचा अभ्यास करत आहे. २०१६ मध्ये पीरियॉडिक फास्टिंगवर संशोधन करणाऱ्या जपानी डॉक्टरला नोबेल पारितोषिक मिळाले होते. या संशोधनात त्यांनी उपवास करणाºया लोकांच्या शरीरातील आजाराची निर्मिती करणाºया पेशी संपून जातात. खासकरून कर्करोगाच्या पेशी नष्ट होत असल्याचे सांगितले आहे.

आपल्या देशातही महामृत्युंजय मंत्र लोकांना जीवनदान देणारा म्हणून मानला जातो. मात्र याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मंत्राचे संशोधन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) निधी दिल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली आहे.संस्कृत विद्यापीठाची मदतगेल्या तीन वर्षापासून चाळीस लोकांची टीम हे काम करत आहे. मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांना दोन गटात विभागून, त्या रुग्णांवर नियमित उपचार करण्यात आले; परंतु एका गटातील रुग्णांना महामृत्युंजय मंत्र ऐकवण्यात आले. यासाठी कुतुबमिनार स्थित संस्कृत विद्यापीठाची मदत घेण्यात आली आहे. महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यासाठी रुग्णांना संस्कृत विद्यापीठात पाठवण्यात आले. या मंत्राचा किती परिणाम या रुग्णांवर होतोय याचा मंत्र न म्हणणाऱ्या गटाबरोबर अभ्यास केला जाईल. त्यानंतरचा अहवाल मेडिकल जर्नलमध्ये पाठवण्यात येणार आहे.