बांसवाडा जिल्ह्यातील सर्वात मोठे महात्मा गांधी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला पाहून अनेकांना एकच प्रश्न पडला आहे. 25 खाटांचे सुसज्ज असे ओटी बांधले खरे पण आत जायचे कसे? होय अगदी बांधकाम करणाऱ्यांच्या मूर्खपणाचा एक नमुनाच इथे दिसत आहे. असे नमुने परदेशात पहायला मिळतात. ती तेव्हाची चूक किंवा फसविण्यासाठी गंमत म्हणून केलेले बांधकाम म्हणून फोटो प्रसिद्ध होतात.
परंतू हा हास्यास्पद प्रकार सरकारी हॉस्पिटलमध्ये घडला आहे. ओटी बांधणारा जो कंत्राटदार होता ते या वॉर्डला दरवाजाच ठेवायचा विसरला आहे. धक्कादायक म्हणजे मागील बाजुने अडीज फुटांचा आपत्कालीन दरवाजा आहे. तेथूनच रुग्णांना यावे लागणार आहे. या दरवाजातून स्ट्रेचर किंवा अन्य मशीन नेता येणार नाहीत.
गेल्या वर्षी राज्य सरकारने बांसवाडाच्या महात्मा गांधी रुग्णालयाच्या बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या वरील मजल्यावर 25 बेडच्या सर्जिकल वॉर्ड बांधण्यासाठी परवानगी मिळाली. यासोबत ऑपरेशन थिएटरदेखील बांधण्यात येणार होते. यासाठई एक कोटीचे बजेट ठेवण्यात आले होते. याची जबाबदारी राष्ट्रीय आरोग्य मिशनला सोपविण्यात आली होती. या वॉर्डचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे, परंतू एक मोठी चूक समोर आली आहे. डिझाईनशिवाय तयार केलेल्या या वॉर्डला येण्याजाण्यासाठी दरवाजाच बांधण्यात आलेला नाही. फक्त आपत्कालीन परिस्थीतीसाठी अडीज फुटांचा दरवाजा ठेवण्यात आला आहे. आता ओटीमधील मशीने आणि तत्सम सामुग्री कशी आत नेणार हाच प्रश्न पडला आहे.
धक्कादायक म्हणजे कंत्राटदाराला शेवटपर्यंत लक्षात आले नाही. कारण त्याने क्रेनच्या साह्याने बांधकाम साहित्य वर पोहोचवले होते. डॉक्टरांनीही याकडे लक्ष दिले नाही. आता या वॉर्डसाठी कसा रस्ता तयार करावा या विचारात सर्व अधिकारी आहेत. आपत्कालीन दरवाजाची वाटही छोटी असल्याने ती वाढविता येणार नाही. आता पाठीमागे एक दरवाजा काढून तिथे जिना बांधावा लागणार आहे. मात्र, तो मोठा भोवाडा पडणार आहे. कारण ओटीमध्ये फार कमी वेळात रुग्णांना पोहोचवावे लागते. या साऱ्या प्रकाराने सरकारी कंत्राटदाराचे पुरते हसे झाले आहे.