नवी दिल्ली: भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनत सब लेफ्टनंट शिवांगी स्वरुप यांनी इतिहास रचला आहे. नौदलाच्या ताफ्यातील विमानांसाठी आतापर्यत एकही महिला कार्यरत नव्हती. त्यामुळे शिवांगी पहिल्या महिला ठरल्या असून आज त्यांना डॉर्नियर विमान उडविण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.
शिवांगी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील रहिवासी असून त्यांनी केरळच्या ऐझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीतून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ते घडलंय याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया शिवांगी स्वरुप यांनी माध्यमांना दिली.
भारतीय नौदलातील एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण विभागात महिला अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश असतो. मात्र महिला पायलट म्हणून शिवांगी या पहिल्या महिला पायलट असणार आहेत. लेफ्टनंट शिवांगी यांना ड्रोनिअर एअरक्राफ्ट उड्डाणाची अधिकृत परवानगी आज ( दि.2 डिसेंबर)ला मिळाली आहे.