शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

सुभाषचौक रस्ता अखेर हॉकर्समुक्त न्यू बी.जे. मार्केटमध्ये आजपासून भरणार बाजार : गोलाणीत केवळ १११ हॉकर्स अधिकृत

By admin | Published: March 29, 2016 12:25 AM

जळगाव : मनपाने केलेल्या आवाहनाला व चर्चेला प्रतिसाद देत चौबे मार्केट ते सुभाष चौक रस्त्यावरील सर्व हॉकर्सने सोमवारी सायंकाळी स्थलांतराची तयारी केली. त्यामुळे हा रस्ता अखेर हॉकर्समुक्त करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. येथील सर्व हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटमध्ये जागा देण्याचे आयुक्तांनी मान्य केल्याने मंगळवारी सकाळी न्यू बी.जे. मार्केटमध्ये या हॉकर्सच्या व्यवसायाला सुरुवात होणार आहे.

जळगाव : मनपाने केलेल्या आवाहनाला व चर्चेला प्रतिसाद देत चौबे मार्केट ते सुभाष चौक रस्त्यावरील सर्व हॉकर्सने सोमवारी सायंकाळी स्थलांतराची तयारी केली. त्यामुळे हा रस्ता अखेर हॉकर्समुक्त करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. येथील सर्व हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटमध्ये जागा देण्याचे आयुक्तांनी मान्य केल्याने मंगळवारी सकाळी न्यू बी.जे. मार्केटमध्ये या हॉकर्सच्या व्यवसायाला सुरुवात होणार आहे.
गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतर करावयाचे की न्यू बी.जे. मार्केटच्या जागेत? याबाबत या हॉकर्समध्येच मतभेद असल्याने या हॉकर्सचे प्रतिनिधी फेरीवाला सेनेचे बाळू बाविस्कर यांनी आयुक्तांना निर्णयासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार चौबे शाळेजवळ हॉकर्सची बैठक घेऊन त्यात न्यू बी.जे. मार्केटमध्ये सर्व ३३२ हॉकर्सच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नियाजअली यांचेही सहकार्य लाभले. आयुक्तांनी सायंकाळी तातडीने हा रस्ता मोकळा करून देण्याची सूचना केली. त्यासाठी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच चर्चाही केली. त्यानंतर हॉकर्सनी तेथील दुकाने आवरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोमवार हा या रस्त्यावरील बाजाराचा शेवटचा दिवस ठरला. मंगळवारी सकाळी न्यू बी.जे. मार्केटमध्ये या हॉकर्सचे स्थलांतर होणार आहे.
-----
शिवाजीरोडवरील हॉकर्स प्रतीक्षेत
शिवाजीरोडवरील हॉकर्सने सहा आठवडे न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करणार असल्याचे स्पष्ट केल्याने न्यू बी.जे. मार्केटच्या जागेवर सुभाष चौकातील हॉकर्सचे स्थलांतर केले जाणार आहे.
--------
प्रशासनाने लकी ड्रॉ द्वारे जागा द्यावी
सुभाष चौकातील हॉकर्सनी मनपा प्रशासनाने न्यू बी.जे. मार्केट येथे लकी ड्रॉ काढून हॉकर्सला जागा देण्याची मागणी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत केली आहे.
---------
बोहरी गल्लीतही स्वत:हून काढणार अतिक्रमण
मनपा आयुक्तांनी सोमवारी बोहरी गल्ली, अशोक टॉकीज रस्त्यावरून फेरफटका मारत तेथील दुकानदारांशी चर्चा केली. त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे मान्य केले.
---------
शिवाजीरोडवरील निम्मे हॉकर्स गोलाणीत
गोलाणी मार्केटमध्ये ४२३ ओटे असून मोकळ्या जागेत मार्किर्ंग करून १२९ हॉकर्सला अशी एकूण ५६२ हॉकर्सला जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यापैकी आधीपासूनच अधिकृत १११ हॉकर्स गोलाणीत आहेत. त्यातील निम्मे हॉकर्स हे शिवाजीरोडवरीलच असल्याने स्थलांतरित होणार्‍या हॉकर्सची संख्या कमी होणार आहे. त्याखेरीज ४५१ हॉकर्सला या ठिकाणी जागा देता येणार असून तेथे बळीरामपेठ, टॉवर ते भिलपुरा पोलीस चौकी रस्त्यावरील २५० हॉकर्सला तसेच शिवाजीरोडवरील उर्वरित हॉकर्सला जागा देण्यात येणार आहे.