मुंबई - पद्मावती चित्रपट वादाच्या पार्श्वभुमीवर भाजपा नेता सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे. 'दीपिका पादुकोण आपल्याला बदलं झाला पाहिजे यावर भाषण देत आहे. देशात बदल तेव्हाच घडेल जेव्हा दिपिका आपला दृष्टीकोन बदलेल', असं ट्विट सुब्रहमण्यम स्वामींनी केलं आहे. दरम्यान न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत स्वामींना दीपिका पादुकोणच्या राष्ट्रीयत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ही एक डच महिला असून, ती भारतीय पवित्रतेवर कसा काय प्रश्न उपस्थित करु शकते ? अशी विचारणा स्वामींनी केली आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'पद्मावती' चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर मौन सोडत कोणीही हा चित्रपट रिलीज होण्यापासून रोखू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे. एक महिला म्हणून या चित्रपटाचा भाग असणं, आणि ही कथा लोकांसमोर मांडण्यात मला गर्व वाचत आहे. जो सांगण्याची गरज नाही असं दीपिका पादुकोन बोलली आहे.
‘आम्ही केवळ आणि केवळ सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत. एक महिला या नात्याने या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान वाटतो आहे. ही एक अशी कथा आहे, जी लोकांपुढे यायलाच हवी. चित्रपटाला विरोध होत असेल तर हे दुर्दैवी आहे. एक राष्ट्र म्हणून आपण कुठे आहोत? हा विरोध अतिशय भयावह आहे. आपण सगळे पुढे जाण्याऐवजी मागे जातोय. चित्रपट प्रमाणित करण्यात कुठलीही अडचण येणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापासून आता कुणीच रोखू शकत नाही. हा लढा केवळ ‘पद्मावती’चा नाही तर एक खूप मोठी लढाई आम्ही लढतो आहोत’, असं दीपिका बोलली आहेत.
1 डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.