नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. देशातील रुग्णालयांत कोरोना रुग्णांनी बेड भरले आहेत. तसेच कोरोनाच्या लढाईत साधनेही कमी पडत आहेत. परिस्थिती अशी आहे, की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयांत व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. (Subramanian Swamy says Gov should stop saying how much o2 is available but tell us how much has been supplied and to which hospital )
ऑक्सीजनच्या कमतरतेवर सुब्रमण्यम स्वामींनी केंद्राला घेरलं -कोरोनाची भयावह स्थिती आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा, यातच भाजचे राज्यसभा खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच सरकारला घेरले आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी ट्विट केले आहे. ते म्हणाले, “आपल्या जवळ किती ऑक्सिजन उपलब्ध आहे, हे सांगणे सरकारने बंद करावे. त्याऐवजी, आपण किती सप्लाय केला आहे आणि तो कोण-कोणत्या रुग्णालयांना केला आहे, हे सरकारने सांगायला हवे.”
स्वामी पुढे म्हणाले, "गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच स्टँडिंग कमिटी फॉर हेल्थने ऑक्सिजन सिलेंडर आणि सप्लायची कमी असल्याचे म्हटले होते. मात्र, सरकारने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही."
CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?
ऑक्सिजन अभावी कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू - कर्नाटकातील चामराजनगर येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तब्बल 24 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे 250 ऑक्सिजन सिलेंडर पाठविण्यात आले आहेत. चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारी येथून ऑक्सिजन मिळणार होता. मात्र ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. यामुळे ही दुर्घटना घडली. सांगण्यात येते, की मृत्यू झालेल्यांतील अधिकांश रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन सप्लाय थांबल्यानंतर ते तडफडू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.
आज देशात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले- देशात गेल्या चोवीस तासांत 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे 3417 जणांचा मृत्यू झाला. तसेच 3 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.
CoronaVirus : ऑक्सिजन पोहोचायला झाला उशीर, कर्नाटकातील रुग्णालयात 24 कोरोना बाधितांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 झाली असून, त्यातील 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत 2 लाख 18 हजार 959 जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 34 लाख 13 हजार 642 इतकी आहे.