नवी दिल्ली : परदेशातील आपल्या संपत्तीच्या आधारे कर्ज काढण्याच्या सहाराप्रमुख सुब्रतो रॉय यांच्या विनंतीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. मात्र याप्रकरणी परदेशी चलनाच्या वापरासाठी त्यांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. न्या. टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेतील तीन सदस्यांच्या खंडपीठाने सहारा प्रमुखांच्या जामिनासाठी लागणाऱ्या रकमेकरिता त्यांच्या परदेशातील हॉटेल्समधून १०५ कोटी डॉलर्स जमविण्याची परवानगी त्यांना दिली आहे. त्यांना जामिनाकरिता ५ हजार कोटी रुपये रोख व ५ हजार कोटी रुपयांची बँक हमी जमवायची आहे. यासाठी त्यांना तिहार तुरुंगात तात्पुरते कार्यालय वापरण्याचीही परवानगी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुब्रतो यांची विनंती सुप्रीम कोर्टाला मान्य
By admin | Published: January 10, 2015 12:11 AM