ऑनालइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - एलपीजी, रॉकेल व सार्वजनिक वितरण प्रणालीवगळता अन्य कोणत्याही सरकारी योजनांसाठी आधार कार्ड सक्ती करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरकारनेही प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भात जाहिराती देऊन जनजागृती करावी असे कोर्टाने नमूद केले आहे.
आधार कार्डाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली असून या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तीन सरकारी योजना वगळता अन्य कोणत्याही योजनेसाठी आधार सक्ती करता येणार नाही असे स्पष्ट केले. आधार कार्डधारकांची कोणतीही माहिती सार्वजनिक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश कोर्टाने संबंधीत यंत्रणांना दिले.