शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

ऊर्जा क्षेत्रात भरीव भागीदारी; भारत-यूएईमध्ये चार करार, युवराज नहयान व मोदींची भेट यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 8:05 AM

मोदींशी चर्चा केल्यानंतर युवराजांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली

नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले अबूधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत व्यापक चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी धोरणात्मक संबंधांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करून ऊर्जा सहकार्य वाढविण्यासाठी चार करारांवर स्वाक्षरी केली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नहयान यांच्यात गाझामधील परिस्थितीसह जागतिक आव्हानांवरही चर्चा झाली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि युवराज यांच्यात बहुआयामी संबंधांवर चर्चा केली. मोदींशी चर्चा केल्यानंतर युवराजांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

चार करार कोणते झाले?  

अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील दीर्घकालीन एलएनजी पुरवठ्यासाठी करार. एडीएनओसी आणि इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (आयएसपीआरएल).अमिरात  न्यूक्लियर एनर्जी कंपनी (ईएनईसी) आणि  न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) मध्ये बाराकाह न्यूक्लियर पॉवर प्लांटच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी करार.अबु धाबी ब्लॉक वनसाठी ऊर्जा भारत आणि एडीएनओसीत उत्पादन सवलत करार.

मोदींच्या २०१५ च्या भेटीनंतर संबंध सुधारलेऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या युएईच्या ऐतिहासिक भेटीनंतर, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी वाढले आहेत.द्विपक्षीय व्यापारासाठी भारतीय रुपया आणि दिरहम (संयुक्त अरब अमिरातीचे चलन) चा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करार केले.

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी