शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

ब्यूटी विद ब्रेन! फीसाठी नव्हते पैसे, आयुष्य संपवावं व्हाटलं पण 'ती' खचली नाही, झाली अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:50 PM

अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतर तस्कीन खान यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली आणि अधिकारी बनली.

मेहनत करून अनेक जण यश मिळवतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. सीडीएस ते हरियाणा पीसीएसपर्यंतच्या सर्व परीक्षा दिल्या. वडिलांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. डिप्रेशनचा सामना केला. आत्महत्येचा विचारही मनात येऊ लागला. पण मनात फक्त कुटुंबाला आधार देण्याची जिद्द होती. त्यामुळे अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतर तस्कीन खान यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली आणि अधिकारी बनली.

मिस उत्तराखंड असणारी तस्कीन खान आता देशसेवा करण्याच्या मिशनवर आहे. २०२२ च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत तिने ऑल इंडिया ७३६ हा रँक मिळवला आहे. हे यश लहान वयात मिळाले असून ती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तस्कीन सांगते की, तिला सुरुवातीपासूनच अभ्यासात फारसा रस नव्हता आणि गणिताची भीती वाटत होती. मात्र तिने मेहनत करून हे स्थान मिळवलं. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते.

एका मुलाखतीत तस्कीन खान सांगते की, तिने बारावीमध्ये इंजिनीअरिंगची एन्ट्रान्स परीक्षा दिली होती, पण तिची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, ती त्यावेळी कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊ शकली नाही. कुटुंबातील मोठी मुलगी असल्याने तिच्यावर खूप जबाबदारी होती. २०१९ पासून सरकारी नोकरीची तयारी सुरू केली आणि पैसे मिळवण्यासाठी घरीच ट्यूशन घेण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे UPSC बद्दल माहिती मिळाली.

तस्कीन यूपीएससी परीक्षेची तयारी करू लागते. २०१९ मध्ये हाय कमिटी ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि शिष्यवृत्ती मिळाली. जामिया मिलिया इस्लामियाची प्रवेश परीक्षा पास केली. तेथून कोचिंग घेतलं. यानंतर तिने अनेक वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या. २०२२ मध्ये UPSC प्रिलिम्स जवळ आल्यावर वडिलांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना ICU मध्ये दाखल करावे लागले. तस्किन खानने परीक्षा दिली आणि प्रिलिम्समध्येही यश मिळवले. पण मुख्य परीक्षा बाकी होती, तयारी करताना खूप अडचणी आल्या, त्यामुळे आत्महत्येचे विचारही मनात येऊ लागले. पण त्या सर्व अडचणींवर मात करत तिने परीक्षा उत्तीर्ण केली. आज तस्किन आयआरएमएस अधिकारी आहे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी