शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नोकरी सोडून स्टार्टअप सुरू, आईचं निधन झालं; पार्टनर पैसे घेऊन पळाला, आता 5 कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:07 AM

स्टार्टअपसाठी त्यांचा एक पार्टनर होता. तो पैसे घेऊन पळून गेला आणि गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यास नकार दिला.

शक्तीस्टेलर कंपनी यशस्वी करणाऱ्या अंकित रॉय यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. अंकित रॉय यांचा फक्त त्याच्या बिझनेस आयडियावर विश्वास होता. या विश्वासामुळे आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयांची होत आहे. त्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. ते मुंबईत कामाला होते. याच दरम्यान, आईच्या आजारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांनी स्टार्टअप सुरू केल्यावर आईचं निधन झालं आणि अंकित डिप्रेशनमध्ये गेले. 

स्टार्टअपसाठी त्यांचा एक पार्टनर होता. तो पैसे घेऊन पळून गेला आणि गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यास नकार दिला. पण तरीही अंकित खचले नाहीत. पुढे मेहनतीने यशस्वी झाले. अंकित यांनी 2009 मध्ये भोपाळच्या राजीव गांधी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. बी.टेक केल्यानंतर त्यांना नोकरी लागली आणि ते मुंबईला आले. पाच वर्षे मुंबईत काम केले. पण, नंतर त्याच्या आईला कॅन्सर झाला. आईच्या उपचारासाठी ते नोकरी सोडून भोपाळला आले.

स्टार्टअप सुरू करण्यासाठी अंकित यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. तरीही, ते कामाला लागले. अंकित सांगतात की, पहिली ऑर्डर त्यांच्या वडिलांच्या मित्राकडून मिळाली. त्यांच्या घरी सोलर पॅनल बसवून 6,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. अंकित यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले तेव्हाच त्याचे काम सुरू झाले होते. आईच्या निधनामुळे अंकित डिप्रेशनमध्ये गेले. पण नंतर 6 महिन्यांनी त्यातून बाहेर आली.

अंकित सांगतात की, त्यांनी पैसे उभे करण्यासाठी खूप संघर्ष केला. एका मित्राने त्यांची ओळख एका माणसाशी करून दिली. त्याने पैसे गुंतवण्याचे मान्य केले. यानंतर त्यांनी एका कंपनीसोबत 6 कोटींचा प्रकल्प करार केला. पण, अखेरच्या क्षणी गुंतवणूकदाराने पैसे गुंतवण्यास नकार दिला. या अडचणींमुळे अंकित खचले नाहीत आणि त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. आतापर्यंत त्यांनी 400 हून अधिक साइट्सवर सोलार पॅनेल बसवले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी