18-19 वर्षे हे असं वय आहे ज्यामध्ये बहुतेक लोक त्यांचं करिअर घडवण्यासाठी धडपडत असतात. पण या वयात एका मुलाने कंपनी काढल्याची घटना समोर आली आहे. त्याचं व्हॅल्यूएशन आता तब्बल 7300 कोटी रुपये आहे. कैवल्य वोहरा असं हा कारनामा करणाऱ्या मुलाचं नाव आहे. कैवल्यची एकूण संपत्ती आता 1200 कोटींहून अधिक असून त्याच्या कंपनीचे नाव Zepto आहे.
मुंबईतील रहिवासी असलेल्या कैवल्य वोहराचा जन्म 2001 साली झाला. त्याचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. त्यानंतर तो अमेरिकेतील स्टॅफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी गेला. पण एके दिवशी त्याने आपली कल्पना त्याचा वर्गमित्र आदित पालीचा याला सांगितली आणि मग ऑनलाईलन क्लास सुरू झाल्यावर त्याने अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही त्यांच्या ई-ग्रोसरी कंपनीत काम करू लागले.
कॉलेजमध्येच सुचली Zepto ची कल्पना
आदित पालीचा यालाही काहीतरी वेगळं करण्याची हौस आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी पहिला स्टार्टअप केला. ज्याचं नाव GoPool होतं. झेप्टोची कल्पना कैवल्य वोहरा याला त्याच्या कॉलेजमध्येच सूचली होती. जेव्हा तो काही ऑर्डर करायचा तेव्हा ऑनलाईन चॅनलद्वारे पोहोचायला दोन दिवस लागायचे. यामुळे त्याला फास्ट डिलिवरी वेंचर सुरू करण्याची कल्पना सुचली.
कैवल्य वोहराने 2021 मध्ये Zepto सुरू केलं. एका वर्षात त्याचं व्हॅल्यूएशन 7300 कोटींपर्यंत वाढलं. कैवल्यची एकूण संपत्ती एक हजार कोटी आहे. तो देशातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. Zepto ला आतापर्यंत 60 मिलियन डॉलर फंडिंग मिळालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.