IAS प्रियंका गोयल यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे. प्रियंका या दिल्लीच्या रहिवासी आहेत. पीतमपुरा येथील महाराजा अग्रसेन मॉडेल स्कूलमधून त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून कॉमर्समध्ये बॅचलर्स डिग्री घेतली. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीसाठी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
प्रियंका फारच सुंदर दिसतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. गोयल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्या अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. प्रियंका यूपीएससी परीक्षेत अनेकदा नापास झाल्या, पण हार मानली नाही. अडचणींचा सामना करत यूपीएससीसारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रियंका गोयल यांनी यूपीएससी परीक्षेत एकूण सहा प्रयत्न केले होते. जर त्या UPSC CSE २०२२ मध्ये नापास झाल्या असत्या तर त्यांचं सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं असतं. पाचवेळा अपयशी होऊनही त्यांनी हिंमत हारली नाही आणि शेवटी आपलं ध्येय गाठलं.
प्रियंका सांगतात की, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर समाज आणि लग्नाचा दबाव वाढू लागला होता. त्यांचा एकच अटेंप्ट शिल्लक होता आणि त्यात त्यांना स्वत:ला सिद्ध करायचं होतं. शेवटी मेहनतीचं फळ मिळालं आणि २०२२ च्या UPSC परीक्षेत ३६९ रँक मिळविला.