ज्यांना वाईट गुण मिळाले आहेत किंवा 10वी किंवा 12वी मध्ये नापास झाले आहेत त्यांनी निराश होऊ नये. कमी गुण किंवा एकवेळ नापास होणे हे एखाद्याचे आयुष्य ठरवू शकत नाही. ईश्वर गुर्जर हे त्याचच एक उदाहरण आहे. बॅकबेंचर असलेला ईश्वर गुर्जर दहावीत नापास झाला. पण नंतर त्याने कमबॅक केलं आणि UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 उत्तीर्ण केली. यूपीएससीच्या प्रवासात त्याला तीन वेळा अपयशालाही सामोरे जावे लागले. पण अपयशामुळे तो खचला नाही.
ईश्वर गुर्जर हा राजस्थानच्या भीलवाडा येथील भांबरा जिल्ह्यातील बडिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. UPSC 2022 मध्ये त्याचा 644 वा रँक आला आहे. त्याचे वडील सुवालाल गुर्जर हे शेतकरी आहेत. तर आई सुखी देवी गृहिणी आहेत. वडिलांनी शेती करून मुलाला शिकवले आहे. आपल्या मुलाच्या यशाचा आता अभिमान आहे. ईश्वर गुर्जर याची बहीण भावना हिचे लग्न झाले आहे. तर धाकटी बहीण पूजा बारावीत शिकत आहे.
ईश्वरने सांगितले की, तो 2011 मध्ये दहावीत नापास झाला होता. यानंतर मी माझे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण वडिलांनी सांगितले की इतक्या लवकर घाबरण्याची गरज नाही. एकदा अपयशी झाल्यानंतर हार मानू नये. यानंतर तो 2012 मध्ये 54% गुणांसह 10वी उत्तीर्ण झाला. त्याला बारावीत 68 टक्के गुण मिळाले होते.
ईश्वर गुर्जरने महर्षि दयानंद विद्यापीठ, अजमेर येथून बीए केले आहे. यानंतर, 2019 मध्ये ते शिक्षक झाले. जवळच्या रुपरा गावातील शासकीय प्राथमिक शाळेत तो ज्वॉईन झाला. यासोबतच यूपीएससीची तयारीही सुरू ठेवली.
ईश्वर गुर्जरने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. 2019 मध्ये तो UPAC प्रिलिम्स देखील क्लियर करू शकला नाही. पण 2020 साली मुलाखतीला पोहोचलो. त्यानंतर 2021 मध्येही तो नापास झाला. तीनवेळा अपयशी होऊनही त्याने हार मानली नाही. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.