ध्येय गाठण्यासाठी काही लोक खूप मेहनत करतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. राहुल सांगवान या तरुणाने कमाल केली आहे. राहुलची आई अंगणवाडी सेविका आहे आणि वडील शिक्षक आहेत. राहुलने सेल्फ स्टडी केला आणि दररोज 7 ते 8 तास अभ्यास करून देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवेत 508 व्या क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
राहुल सांगवान हा मूळचा हरियाणातील भिवानी येथील मिताथल गावचा रहिवासी आहे. त्याने आपले शालेय शिक्षण भिवानी येथून पूर्ण केले आणि नंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने चौधरी बन्सीलाल विद्यापीठातून एमए पूर्ण केले. राहुलचे वडील व्यवसायाने शिक्षक आहेत तर आई अंगणवाडी सेविका आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुलला सुरुवातीपासूनच नागरी सेवेबाबत आकर्षण होते. अशा परिस्थितीत त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने राज्यस्तरीय परीक्षांवर लक्ष केंद्रित केलं. तसेच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत राहिला आणि यामध्ये घवघवीत यश मिळवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.