शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

Success Story: अवघ्या २ लाखात सुरू केला केक-पेस्ट्रीचा व्यवसाय अन् आज ७५ कोटींची उलाढाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:54 PM

शून्यातून जग निर्माण करणऱ्या हरहुन्नरी व्यक्तींची अनेक उदाहरण आपण आजवर पाहिली आहेत. अशीच एक तीन जीवलग मित्रांची कहाणी सर्वांना प्रेरणादायी आणि चकीत करणारी आहे.

शून्यातून जग निर्माण करणऱ्या हरहुन्नरी व्यक्तींची अनेक उदाहरण आपण आजवर पाहिली आहेत. अशीच एक तीन जीवलग मित्रांची कहाणी सर्वांना प्रेरणादायी आणि चकीत करणारी आहे. गप्पागप्पांमध्ये या तीन मित्रांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी आजवर कधीच मागे वळून पाहिलेलं नाही. खरंतर २०१० सालापासूनच त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण २०१६ नंतर त्यांच्या व्यवसायानं खरी झेप घेतली. तीन मित्रांनी २०१० साली अवघ्या २ लाखांच्या भांडवलावर बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांची उलाढाल तब्बल ७५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. या तीन मित्रांची नावं जाणून घेण्याआधी त्यांच्या कंपनीची माहिती घेऊयात. 'बेकिंगो' नावानं त्यांची कंपनी बेकरी व्यवसायात पाय रोवून उभी आहे. या बेकरीचं संपूर्णपणे व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं होतो. अगदी छोट्या पातळीवर सुरू झालेली ही ऑनलाइन बेकरी आज देशातील ११ शहरांमध्ये सेवा देत आहे. 

एकत्र काम करणाऱ्या तिघांमध्ये कॉलेजच्या दिवसांपासून मैत्री होती. हिमांशू चावला, श्रेय सहगल आणि सुमन पात्रा अशी त्यांची नावं आहेत. २०१० मध्ये तिघांनीही २ लाख रुपयांत व्यवसाय सुरू केला, मात्र २०१६ मध्ये बेकिंगो ही कंपनी सुरू झाली. दिल्लीच्या नेताजी सुभाष विद्यापीठात शिकत असताना त्यांच्या मनात स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा विचार आला आणि त्यांनी वेळ न दवडता त्यावर कामही सुरू केलं.

कसा सुरू झाला व्यवसायकाही वर्षे कॉर्पोरेट नोकरी केल्यानंतर, तीन मित्रांनी २०१० मध्ये फ्लॉवर ऑरा हा त्यांचा पहिला उपक्रम सुरू केला. ही कंपनी ऑनलाइन फुलं, केक आणि वैयक्तिक भेटवस्तू देत असे. गुडगावमधील एका गोडाऊनमधून कंपनीचं काम सुरू करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना २ लाख रुपर्य खर्च आला. सुरुवातीला, कंपनीकडे फक्त एक कर्मचारी होता जो ग्राहक सेवा तसेच ऑपरेशन्स आणि डिलिव्हरी पाहत असे. २०१० चा व्हॅलेंटाईन डे कंपनीसाठी शुभ ठरला आणि त्या दिवसापासून व्यवसायाला तेजी आली.

'व्हॅलेंटाईन डे'नं नशीब पालटलं2010 च्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इतकं काम आलं की कंपनीच्या उर्वरित पार्टनर्सना देखील ऑनलाइन डिलिव्हरीचं व्यवस्थापन आणि डिलिव्हरी करावी लागली. हिमांशू आणि श्रेयने त्या दिवशी दिल्ली एनसीआरमध्ये 50 टक्के डिलिव्हरी केली. कंपनीच्या उत्पादनाची मागणी वाढू लागल्यानं कंपनीला पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे, असं तीन मित्रांना वाटलं. 2016 मध्ये, हिमांशू, श्रेय आणि सुमन पात्रा या तीन मित्रांनी बेकिंगो नावाच्या त्यांच्या नवीन कंपनी अंतर्गत एक वेगळा ब्रँड सुरू केला.

११ राज्यांमध्ये व्यवसायबेकिंगोने देशातील इतर राज्यांमध्ये फ्रेश केकची डिलिव्हरी सुरू केली. लवकरच कंपनीचा व्यवसाय ११ राज्यांमध्ये पसरला. कंपनीच्या म्हणण्यानुसार केकची विक्री केवळ हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्ली एनसीआर या मेट्रो शहरांमध्येच नाही तर मेरठ, पानिपत, रोहतक आणि कर्नालसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील केली जाऊ शकते. बेकिंगो आपली ३० टक्के उत्पादनं ऑनलाइन विकते तर उर्वरित ७० टक्के उत्पादनं स्विगी आणि झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी पोर्टलवर विकली जातात. 2021-22 या आर्थिक वर्षात बेकिंगोची उलाढाल ७५ कोटी रुपये होती आणि ५०० ​​लोकांना रोजगार मिळाला आहे. बेकिंगोचे पहिले ऑफलाइन स्टोअर या वर्षी दिल्लीत उघडले आहे.

टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी