बेंगळुरू : इस्रोने सोमवारी अंतराळ प्रवेशावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पुनर्वापरायोग्य रॉकेटच्या विकासाच्या दिशेने दमदार पाऊल टाकताना ऐतिहासिक प्रक्षेपणाचा इतिहास घडविला आहे. संपूर्ण स्वदेशी आरएलव्ही-टीडीच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करताना भारताने उपग्रह मोहिमांवरील खर्च कमी करण्याच्या प्रक्रियेत नवा अध्याय जोडला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण झालेल्या सदर अंतराळ यानाला ‘स्वदेशी स्पेस शटल’ असे संबोधण्यात आले आहे. खास बूस्टरद्वारे ६५ कि.मी.पेक्षा जास्त उंचीवर अंतराळात पाठविलेल्या दुहेरी डेल्टा पंख असलेल्या यानाने पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करीत बंगालच्या खाडीपर्यंतचा आपला प्रवास नियमबरहुकूम पूर्ण केला. सुमारे मॅक - ५ म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट वेगाने वातावरणात प्रवेश करताना आणि जमिनीकडे येताना दिशा सूचक, मार्गदर्शक आणि नियंत्रण प्रणालीने अगदी अचूकरीत्या कार्य पार पाडले. पृथ्वीच्या वातावरणातील पुन:प्रवेशाच्या वेळी अतितापमानापासून बचावासाठी वापरण्यात आलेल्या टीपीएस यंत्रणेमुळे वाहन नष्ट होण्याचा धोका टाळता आला. श्रीहरीकोटापासून सुमारे ४५० किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात नियोजित स्थळी रॉकेट पाडण्यात शास्त्रज्ञांना यश आले. या एअरो स्पेस वाहनाचे वजन १.७५ टन असून, आकार स्पोर्ट्स युटिलिटी वाहनासारखा (एसएमव्ही) होता. समुद्रात पडताच त्याचे तुकडे झाले, तथापि ही मोहीम फत्ते झाली. पाण्यावर तरंगेल असे डिझाईन बनविण्याचा टप्पा नंतरच्या प्रक्रियेत पूर्ण केला जाणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. श्रीहरीकोटाच्या केंद्रावरून या वाहनाचा संपूर्ण प्रवास बघता आला. उड्डाण ते समुद्रात पाडण्यात येईपर्यंतची प्रक्रिया ७७० सेकंदांपर्यंत चालली. (वृत्तसंस्था)उपग्रह प्रक्षेपणासाठी खर्चकपातीचे उद्दिष्ट...आरएलव्हीचा अंतिम उद्देश पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडून परत आणणे हाच राहणार असून पुनर्वापरायोग्य रॉकेटमुळे उपग्रह प्रक्षेपणावरील खर्च दहापटीने कमी करणे शक्य होणार आहे. अमेरिकन शटलसारख्या दिसणाऱ्या या यानाचा आकार अंतिम आवृत्तीच्या तुुलनेत सहा पट कमी होता. या प्रकल्पासाठी सरकारने ९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.पाण्यावर तरंगेल असे डिझाईन बनविण्याचा टप्पा नंतरच्या प्रक्रियेत पूर्ण केला जाणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. श्रीहरीकोटाच्या केंद्रावरून या वाहनाचा संपूर्ण प्रवास बघता आला.आरएलव्ही-टीडी हे पुनर्वापरायोग्य रॉकेटच्या विकासातील पहिले पाऊल.अंतिम आवृत्तीसाठी लागणार १० ते १५ वर्षे.पहिल्यांदाच पंख असलेल्या वाहनाचा वापर.उपग्रहांच्या अंतराळ प्रवेशाचा खर्च दहा पटीने कमी होणार.आरएलव्ही उतरविण्यासाठी अमेरिकेच्या स्पेस शटलच्या धर्तीवर धावपट्टी बनविणार.आरएलव्हीला 65किमी उंचीवर नेण्यासाठी घन इंधनाचा वापर.निर्मितीसाठी लागली पाच वर्षे. तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रावर सुट्या भागांची जुळवणी.मध्य समुद्रात वाऱ्याचा वेग आणि जहाजावरील दुर्बीण यंत्रणेच्या वापरासाठी तटरक्षक दल आणि राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्थेचे(एनआयओटी) सहकार्य.श्रीहरीकोटापासून 450किमी अंतरावर बंगाल उपसागरात नियोजित स्थळी रॉकेट पाडण्यात शास्त्रज्ञांना यश आले. या एअरो स्पेस वाहनाचे वजन 1.75टन असून, आकार स्पोर्ट्स युटिलिटी वाहनासारखा (एसएमव्ही) होता. आमच्या शास्त्रज्ञांनी औद्योगिक आघाडीवर मजल गाठताना स्वदेशी स्पेस शटल आरएलव्ही-टीडीचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्याबद्दल अभिनंदन! त्यांनी अनेक वर्षांपासून दाखविलेली धडाडी व समर्पण अपवादात्मक आणि प्रेरक आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान (इराणमधून टिष्ट्वट)अंतराळ मोहिमांवरील खर्च कमी करण्यासाठी हा प्रयत्न आवश्यक होता. त्या दिशेने प्रवास करताना प्रयोगांची मालिकाच पार पाडली जाणार असून, हे पहिले पाऊल होते. आरएलव्ही मोहीम प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भारताला लांबची मजल गाठावी लागेल.- किरण कुमार, इस्रोचे अध्यक्ष
‘स्पेस शटल’ची यशस्वी ‘वापसी’
By admin | Published: May 24, 2016 4:47 AM