शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

पोलिसांनी अटकेसाठी ज्यांच्या घराचा दरवाजा तोडलेला, तेच रेवंत रेड्डी आज झाले CM!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:07 PM

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठं यश मिळवलं.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठं यश मिळवलं, याआधी केसीआर सरकाच्या काळात काँग्रेस विरोधी पक्षही नव्हता. तेलंगणात प्रमुख विरोधी पक्ष हा भाजप होता. पण या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सरकार स्थापन केले. काँग्रेसच्या या यशाच्या मागे सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे रेवंत रेड्डी यांचं.  रेवंत रेड्डी यांच्याकडे २०२१ मध्ये प्रदेशाध्यक्षपद मिळाले, यानंतर त्यांनी दोन वर्ष फक्त पक्षासाठीच काम करणार असल्याचे सांगितले होते. पुढ त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यावर आवाज उठवत सरकारविरोधात आंदोलन केली, खरतर यानंतर ते जनतेसमोर प्रसिद्ध झाले.

रेवंत रेड्डी, तुमचं अभिनंदन आणि मी आश्वस्त करतो की...; पंतप्रधान मोदींनी दिला शब्द!

आज रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचा कार्यकर्ता, प्रदेशाध्यक्ष ते तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांपर्यंतचा त्यांचा प्रवास मोठा आहे. या काळात त्यांना तुरुंगातही जावे लागले. 

रेवंत रेड्डी यांनी राज्यभरात लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेतले. त्यावेळीच त्यांनी कार्यकर्त्यांना सांगतिलं होतं की, सर्वसामान्यांचा आवाज आपण बनलो तर आपण २०२३ मध्ये सत्तेत येऊ शकतो. झालंही तसंच काँग्रेसने ६४ जागा मिळवत सत्ता स्थापन केली. बीआरएस सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन आंदोलन करताना रेड्डी यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले, एकवेळ अशी होती की पोलिसांनी त्यांना घराचा दरवाजा तोडून ताब्यात घेतले होते. 

बीआरएस सरकारकडून रेवंत यांना सतत त्रास दिला. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले. एबीव्हीपी नेता म्हणून सुरुवात केलेल्या रेवंत यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टीडीपीमध्ये बराच काळ घालवला. ते काँग्रेसमध्ये येऊन फक्त ६ वर्ष झाले आहेत. २०२१ मध्ये त्यांची तेलंगणा प्रमुख म्हणून निवड केली, तेव्हा काँग्रेसमधील फार कमी लोकांना त्यांच्याबद्दल नीट माहिती होती.

बीआरएस सरकारने रेवंत रेड्डी यांनाही तुरुंगात पाठवले

बीआरएस सरकारने रेवंत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले. त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगातही पाठवले होते. यापैकी पहिली कारवाई डिसेंबर २०१८ मध्ये घडली, जेव्हा KCR यांना त्यांच्या कोडंगल भेटीच्या निषेधाच्या आवाहनानंतर मूळ कोडंगल येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता.

सात वेळा नजरकैद

मार्च २०२० मध्ये, KCR यांचा मुलगा आणि BRS कार्याध्यक्ष केटी रामाराव यांच्या कथितपणे बेकायदेशीरपणे बांधलेल्या फार्महाऊसवर ड्रोन उडवून अनोखा निषेध करण्यासाठी त्यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत घालवले. डिसेंबर २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत रेवंतची प्रतिमा सतत उंचावत असतानाही, त्यांना सात वेळा नजरकैदेत ठेवण्यात आले. भ्रष्टाचाराचा मुद्दा असो की शेतकऱ्यांचा मुद्दा असो, जमिनी हडपण्याचा मुद्दा असो, तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असो, आंदोलन करायचे तेव्हा त्यांना पोलीस घरीच रोखायचे. या आंदोलनामुळेच रेवंत रेड्डी यांची तेलंगणात प्रसिद्धी वाढत गेली. आज रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

टॅग्स :Telanganaतेलंगणा