नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर सोमवारी येथील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.जेटली आणि त्यांना मूत्रपिंड देणारा दाता या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, असे ‘एम्स’ने एका निवेदनाव्दारे जाहीर केले. मूत्रपिंडाच्या आजारामुळे ६५ वर्षांच्या जेटली यांच्यावर गेले महिनाभर डाएलिसिस करण्यात येत होते. शनिवारी त्यांना ‘एम्स’मध्ये दाखल केले गेले व सोमवारी सकाळी आठ वाजता शल्यक्रियागृहात नेण्यात आले. स्वत: जेटली यांनी महिनाभरापूर्वी टिष्ट्वट करून आपल्या आजाराची माहिती दिली होती.>या शस्त्रक्रियेमुळे जेटली यांनी पुढील आठवड्यातील लंडनचा नियोजित दौरा रद्द केला आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांनी वजन कमी करण्यासाठी ‘बॅरियाट्रिक सर्जरी’ करून घेतली होती. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रियाही केली गेली होती.
अरुण जेटलींवर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:18 AM