भुवनेश्वरः ओडिशाच्या चांदीपूरमध्ये चाचणी श्रेणी(आयटीआर)त मंगळवारी सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं परीक्षण करण्यात आलं. संरक्षण संशोधन व विकास संस्थे(डीआरडीओ)च्या सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसाइलचं परीक्षण आईटीआरमध्ये करण्यात आलं आहे. ही जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे. जिची मारक क्षमता जबरदस्त आहे. ब्रह्मोस मिसाइलचा जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करू शकतो. या मिसाइलची मारक क्षमता 290 किलोमीटरच्या जवळपास आहे.भारताच्या कूटनीतीसाठी शस्त्रास्त्रं आहे. चीन आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर ही मिसाइल निर्णायक ठरत आहे. ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या 7 ते 10 वर्षांत आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक 7’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे. सध्या ‘मॅक 2.8’ वेगाने मारा करणारे हे क्षेपणास्त्र टप्प्याटप्प्याने वेग वाढवून सध्याच्या ‘सुपरसॉनिक’वरून अधिक वरच्या ‘हायपरसॉनिक’ श्रेणीत नेण्यात येईल, असे गेल्या काही दिवसांपूर्वी ‘ब्रह्मोस एअरोस्पेस‘ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुधीर मिश्रा यांनी सांगितले होते.चारच देशांकडे तंत्रज्ञान - आवाजाच्या दुप्पट ते तिप्पट वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अनेक देशांकडे आहेत. पण आवाजापेक्षा चारपट किंवा त्याहून अधिक वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगात फक्त चार देशांकडे आहे. अमेरिका या तंत्रज्ञानावर सध्या काम करीत आहे. याखेरीज दोन प्रकारची क्षेपणास्त्रे रशिया स्वतंत्रपणे विकसित करीत आहे. रशिया आणि चीन संयुक्तपणे दोन प्रकारची क्षेपणास्त्रे निर्मित करीत आहे. त्यानंतर भारत-रशिया यावर काम करीत आहे.मारक क्षमताही वाढणार : भारत अलिकडेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण देशांच्या गटाच्या (एमटीसीआर) निर्बंधांतून बाहेर पडला. त्यामुळे सुपरसोनिक वेगाच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 300 किमीच्यावर नेण्यावरील बंधनातून भारताची मुक्तता झाली आहे. यामुळेच सध्याच्या ब्रह्मोसची मारक क्षमता 450 किमीवर नेली जात आहे. त्यानंतर हायपरसोनिक (मॅक 7) श्रेणीतील ब्रह्मोसची मारक क्षमता 700 किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 8:42 AM