बलसोर (ओडिशा) : सोमवारी भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पहिले सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरील चांदीपूर येथील चाचणी तळावरून निर्भयची चाचणी घेण्यात आली. निर्भयच्या चाचणीमुळे भारताची मारक क्षमता वाढणार आहे.संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. डीआरडीओच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, विविध प्लॅटफॉर्मवर तैनात करण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चाचणी संकुल-३ वरून सकाळी ११.४४ वा. सोडण्यात आले. ४२ मिनिटे २३ सेकंदांत त्याने आपले लक्ष्य भेदले. (वृत्तसंस्था)
भारताकडून सब-सॉनिक निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 06:12 IST