शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

‘विक्रम’ची भ्रमणकक्षा यशस्वीपणे आणली खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 5:06 AM

चांद्रयान-२ मोहीम : शनिवारी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार

बंगळुरू : चांद्रयान-२ चे लँडिंग मोड्यूल ‘विक्रम’ची भ्रमणकक्षा पहिल्यांदाच मंगळवारी यशस्वीपणे खाली आणली गेली आणि आता भारतासाठी अत्यंत ऐतिहासिक असे काम राहिले आहे ते शनिवारी अगदी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसाठी अंतिम कौशल्यपूर्ण कृतीचे. देशातच विकसित केलेले लँडर फक्त चार सेकंदांत भ्रमणकक्षेतून बाहेर काढण्याचे काम केले गेले. त्याच्या आदल्या दिवशी चांद्रयान-२ च्या भ्रमण कक्षेतून लँडर वेगळे केले गेले होते. हे काम महत्त्वाचा मैलाचा दगड ठरले. त्यामुळे भारताची दुसरी चांद्र मोहीम शेवटच्या आणि फारच महत्त्वाच्या टप्प्यात म्हणजे चंद्रावर सॉफ्ट आणि नियंत्रण असलेल्या लँडिंगकडे सरकली आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले.

चंद्राकडील या प्रवासातील सगळी कामे ३,८४० किलोग्रॅमच्या चांद्रयान-२ उपग्रहाच्या मुख्य आॅर्बिटरने पार पाडली आहेत. हा उपग्रह गेल्या २२ जुलै रोजी पृथ्वीच्या भ्रमणकक्षेतून अवकाशात सोडण्यात आला होता. सात सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘विक्रम’ उतरणार असून, त्याआधी इस्रो बुधवारी भ्रमणकक्षेतून बाहेर पडण्याची आणखी एक योजनाबद्ध कृती करणार आहे. भारताची प्रतिष्ठा वाढणारच्सात सप्टेंबर रोजी विक्रमचे यशस्वी लँडिंग झाले की, रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे लँडर उतरवणारा भारत जगात चौथा देश ठरणार आहे; परंतु चंद्राच्या आतापर्यंत शोधण्यात न आलेल्या दक्षिण ध्रुवावर ही पहिलीच मोहीम असेल. तीन सप्टेंबर, २०१९ रोजी चांद्रयान-२ उपग्रहासाठीची भ्रमणकक्षेतून पहिली बाहेर पडण्याची योजनाबद्ध कृती भारतीय प्रमाण वेळ ८.५० वाजता ठरल्याप्रमाणे सुरू झाली व ती कृती अवघ्या चार सेकंदांची होती, असे इस्रोने सांगितले. चांद्रयान-२ मोहिमेला ९७८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Marsमंगळ ग्रहIndiaभारतisroइस्रो