तिरुअनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांच्या दोन दिवसांच्या केरळ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी कोची वॉटर मेट्रोसह विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास वेगाने होईल, असे मत व्यक्त केले. मोदींनी सकाळी ११:१० वाजता तिरुअनंतपुरम मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरून ही रेल्वे रवाना केली. तत्पूर्वी त्यांनी रेल्वेच्या डब्यातील शाळकरी मुलांच्या गटाशी संवाद साधला.
पंतप्रधानांचा सहा किलोमीटर रोड शोमध्ये ते वाहनाच्या फूटबोर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन करत होते.
अशी आहे मेट्रो
१० बेटांना ही वॉटर मेट्रो जोडणार
२० ते ४० रुपये तिकीट असेल.
मेट्रो बॅटरीवर चालणारी असेल.
पंतप्रधान मोदींच्या स्वागताला हजारो लोकांनी गर्दी केली होती.