आग्रा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय तरुण जसवीर उर्फ वीरू आग्रा येथील एका मिठाईच्या दुकानात काम करत होता पण अचानक तो खाली कोसळला. तो पडताच त्याचा एक साथीदार त्याला उचलण्यासाठी पुढे आला पण जसवीर काहीच हालचाल करत नव्हता.
जसवीरच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. हार्ट अटॅकमुळे जसवीरचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं. मात्र जसवीरच्या मृत्यू मागचं खरं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल.
जसवीरच्या या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आग्रा येथील कमला नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. यामध्ये जसवीर मिठाईच्या दुकानात काम करत असताना आपल्या मित्रांसोबत बोलत होता आणि अचानक खाली पडल्याचं दिसत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.